मुंबई : अभिनेता अक्षय कुमारच्या ‘बेलबॉटम’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार सीक्रेट एजंटच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटात वाणी कपूर, हुमा कुरैशी आणि लारा दत्ताही मुख्य भूमिकेत दिसत आहेत. तसेच हा चित्रपट येत्या येत्या 19 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.
बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित ‘बेल बॉटम’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज होणार असल्याचे अक्षयने घोषित केलं होतं. अक्षयने नुकतच त्याच्या सोशल मीडियावर आज संध्याकाळी 5 वाजता ट्रेलर रिलीज होणार असल्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. तो आताच रिलिज झाला.
सिनेमाच्या संपूर्ण टीम सोबत दिल्लीमध्ये बेल बॉटम सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. अक्षयने सोशल मीडियावर सिनेमाचं पोस्टर शेअर करत आपल्या भूमिके बाबत थोडीफार माहिती शेअर करत करत लिहले आहे की, “कुशाग्र बुद्धिमत्ता,नॅशनल लेवल बुद्धीबळपट्टू,गाणं शिकवतो,हिंदी,इंग्लिश,जर्मन भाषा बोलतो. उर्वरीत माहिती ट्रेलर मध्ये .”
Mission: To Entertain you on the BIG SCREEN
Date: August 19, 2021
Announcing the arrival of #BellBottom! #BellBottomInCinemasAug19@vashubhagnani @humasqureshi @LaraDutta @ranjit_tiwari @jackkybhagnani @honeybhagnani @monishaadvani @madhubhojwani @nikkhiladvani @EmmayEntertain pic.twitter.com/4z9jCdmJj3— Akshay Kumar (@akshaykumar) July 30, 2021
माहितीनुसार हा चित्रपट १९ ऑगस्ट रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित केला जाणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
८० च्या दशकातील एका सत्य घटनेवर आधारित ‘बेल बॉटम’ चित्रपट आहे. हा एक स्पाय थ्रिलर चित्रपट आहे. यामध्ये अक्षय डिटेक्टिवच्या भूमिकेत दिसणार आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अक्षय कुमारने या चित्रपटातील पहिला लूक प्रदर्शित केला होता.
सिनेमाबद्दल सांगायचे झाल्यास कोरोना व्हायरस दरम्यान योग्य काळजी घेत सिनेमाचे चित्रीकरण करण्यात आले. तसेच सिनेमाचं संपुर्ण शुटिंग परदेशात झाले आहे. अक्षय सोबतच सिनेमात हुमा कुरैशी,वाणी कपूर,लारा दत्ता,यांच्या देखिल मुख्य भूमिका आहे.
‘बेल बॉटम’ या चित्रपटाची निर्मिती वाशु आणि जॅकी भगनानी सोबत निखिल अडवाणी देखील करत आहे. दरम्यान, येत्या काळात अक्षयचे ‘सूर्यवंशी’ ‘लक्ष्मी बम’, ‘पृथ्वी राज’ ‘बच्चन पांडे’, ‘अतरंगी रे’ ‘धूम 4’ आणि ‘बेल बॉटम’ असे एकूण सात चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. तसेच लवकरच तो ‘बाप रे बाप’ या चित्रपटातही झळकणार असल्याचे म्हटले जात आहे.