तेहरान : इराणमध्ये कोरोनामुळे परिस्थिती गंभीर होत आहे. त्यामुळे या देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. सोमवारपासून सलग सहा दिवस लॉकडाऊन असणार आहे. यावेळी अत्यावश्यक सेवा सोडून सर्व सेवा बंद ठेवल्या जाणार आहेत. तसेच इराणमधील सर्व शहरांदरम्यान रविवार ते शुक्रवारपर्यंत प्रवासबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. येथे कोरोनाची पाचवी लाट येण्याचा धोका आहे.
इराणमध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 20 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. लाखो लोकांचा जीव गेला आहे. सध्या इराणमध्ये कोरोनाचा विस्फोट झाला आहे. दर 2 मिनिटाला एका व्यक्तीचा मृत्यू होत आहे. तर कोरोना लसीचा देखील मोठा तुटवडा आहे. इराण सरकारनेच याबाबत माहिती दिली आहे. गेल्या सोमवारी कोरोनामुळे इराणमध्ये 588 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे इराणच्या 31 प्रांतामधील अनेक भागांत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
इराणच्या अनेक शहरांतील रुग्णालयांत बेडची संख्या तोकडी आहे. इराणमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 94 हजार 603 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एका दिवसांत 40 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून येत आहेत. इराणच्या सरकारी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, दर 2 सेकंदाला एका व्यक्तीला कोरोनाची लागण होत आहे. तर दर दोन मिनिटाला एकाचा मृत्यू होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून वाढत्या रुग्णसंख्येने आणि मृतांच्या संख्येने इराण प्रशासनाची चिंता वाढली आहे.
कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेदरम्यान उद्भवलेला डेल्टा व्हेरिएंट सर्वाधिक घातक असल्याचं तज्ज्ञांकडून सांगितलंय. हा व्हायरस सध्या जगातील 135 देशांमध्ये पसरला असून अख्या जगाची चिंता वाढत आहे. डेल्टा व्हेरिएंट इतर व्हेरिएंच्या तुलनेत सर्वाधिक संसर्गजन्य आणि घातक असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
डेल्टा व्हेरिएंटमुळे अन्य आजारांना देखील आमंत्रण मिळत आहे. कोरोना व्हायरसचा डेल्टा व्हेरिएंट इतर व्हेरिएंच्या तुलनेत सर्वाधिक संसर्गजन्य आणि घातक आहे. रुग्णांमध्ये याची लक्षणे कमी वेळात दिसून येत आहेत. चीनी संशोधकाच्या मते डेल्टा व्हायरस हा कोरोना व्हायरसच्या मुळ रुपाच्या तुलनेत तब्बल 1260 पट अधिक संसर्गजन्य आहे. काही अमेरिकन संशोधकांच्या मते, लसीकरण झालेल्या व्यक्तींनाही डेल्टाची लागण झाली आहे.