मुंबई : कर्नाटक परिवहन विभागाने बिग बी अमिताभ बच्चन यांच्या नावावर रजिस्टर्ड असलेली रोल्स रॉयस कार जप्त केली. मात्र बच्चन यांच्याकडून ही कार बंगळूरमधील उमराह डेव्हलपर्सचे मालक बाबू यांनी खरेदी केली आहे. पण त्यांनी या कारचं रजिस्ट्रेशन केले नाही. ते म्हणाले, मी बच्चन यांच्याकडून 6 कोटी रूपयांमध्ये कार खरेदी केली होती. मी रजिस्ट्रेशनसाठी नाव बदलण्यासाठी अर्ज केला. पण काही कारणांमुळे होवू शकलेलं नाही.
बाबू यांनी ही लक्झरी कार बिग बी यांच्याकडू खरेदी केल्याचं स्पष्ट केलं आहे. ते म्हणाले, “माझे कुटुंबिय कधीतरी या गाडीचा वापर करतात. त्यांनी या गाडीसह इतर लक्झरी गाड्या ताब्यात घेतल्या. वाहनाची कागदपत्रे सादर केल्यानंतर मला माझ्या गाड्या पुन्हा मिळतील असं सांगण्यात आलंय. ही कार अजूनही बच्चन यांच्या नावावर आहे.” असं बाबू यांनी कबूल केलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अमिताभ बच्चन यांच्या एका लक्झरी कारवर बंगळूरु पोलिसांनी कारवाई केली आहे. कर्नाटक परिवहन विभागाने एक रोल्स-रॉयस फँटम गाडी जप्त केली. ही लक्झरी कार बिग बी अमिताभ बच्चन यांच्या नावावर रिजिस्टर आहे. तर कार चालवणाऱ्या व्यक्तीचं नाव सलमान खान असल्याने अधिक चर्चा होत आहे. सलमान खान अशी असून ही व्यक्ती वसंतनगरची रहिवासी आहे. त्यांच्या वडिलांनी बच्चन यांच्याकडून ही कार खरेदी केल्याची माहिती अतिरिक्त परिवहन आयुक्त एल एल नरेंद्र होळकर यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.
निर्माते विधु विनोद चोप्रा यांनी बिग बींना ही कार भेट म्हणून दिली होती. 2007 सालामध्ये आलेल्या ‘एकलव्य’ या चित्रपटाच्या यशानंतर त्यांनी बिग बींना ही कार भेट केली होती. 2019 मध्ये उमरा डेव्हलपर्सच्या युसूफ शरीफ उर्फ डी बाबू यांना बिग बींनी ही कार विकली होती. मात्र कारचे व्यवहार झाल्यानंतरही या कारची मालकी बिग बी यांच्या नावावरच असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. दरम्यान ‘वाहन’ या ऑनलाईन पोर्टलवर या गाडीची माहिती उपलब्ध नाही.