मुंबई : ड्रग्स प्रकरणात पुन्हा एकदा मुंबईत एनसीबीने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणात आज अभिनेता गौरव दीक्षितला अटक केल्यानंतर त्याची 30 ऑगस्टपर्यंत एनसीबीच्या कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे आज प्रसिद्ध अभिनेता अरमान कोहलीच्या घरीही पोलिसांनी छापा टाकला आहे. ड्रग्स प्रकरणात त्याच्या घराची झाडाझडती घेण्यात आली आहे.
बॉलिवूड अभिनेता अरमान कोहलीला ड्रग्स प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने आज अटक केली आहे. याआधी त्याच्या घरी एनसीबीने छापा टाकला होता. त्याच्या घरातून ड्रग्स जप्त करण्यात आल्याचे वृत्त आहे. आता अरमानची एनसीबीच्या कार्यालयात चौकशी केली जाणार आहे. दरम्यान आज सकाळी टीव्ही अभिनेता गौरव दीक्षितला एनसीबीने अटक केली होती. त्याला 30 ऑगस्टपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शुक्रवारी रात्री एका ड्रग्स विक्रेत्याला एनसीबीकडून पकडण्यात आले होते. त्याच्याजवळ ड्रग्स रॅकेट संदभार्त अधिक चौकशी केली असतात अभिनेता अरमान कोहली याचा देखील यात समावेश असल्याची धक्कादायक माहिती एनसीबी ला मिळाली होती व पुराव्यांच्या आधारावर आज त्याच्या घरावर छापेमारी करत त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
विशेष म्हणजे ड्रग्स प्रकरणात एनसीबीने अजाज खानला मार्च महिन्यात अटक केली होती. ड्रग्स प्रकरणात ड्रग पेडलर शादाब बटाटा याला अटक केल्यानंतर अभिनेता एजाज खान याचं नाव समोर आलं होतं. एजाज खानवर शादाब बटाटा यांच्या टोळीचा भाग असल्याचा आरोप आहे. शादाब बटाटा हा मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्स सप्लायर फारुख बटाटा याचा मुलगा आहे. दरम्यान, एनसीबीने यापूर्वी जेव्हा शादाब बटाटाला याला अटक अटक केली होती तेव्हा सुमारे २ कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आले होते.
NCB ने यापूर्वी एप्रिल महिन्यामध्ये गौरव दीक्षित यांच्या मुंबईतील लोखंडवाला येथील निवासस्थानी छाप्यात त्यांना अंमली पदार्थ सापडले होते. मात्र, तेव्हा तो घरी नव्हता. त्यानंतर एनसीबीनंतर त्याला आरोपी म्हणून घोषित केलं आणि ते त्याच्या शोधात होते.