Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अभिनेत्री सायरा बानू रुग्णालयात; आयसीयूमध्ये उपचार सुरू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुड

अभिनेत्री सायरा बानू रुग्णालयात; आयसीयूमध्ये उपचार सुरू

Surajya Digital
Last updated: 2021/09/01 at 5:03 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानू यांना खार येथील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्यांना रक्तदाबासंबंधी समस्या जाणवू लागल्या होत्या. सध्या त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अभिनेते दिलीप कुमार यांचे जुलै महिन्यात निधन झाले. तेव्हापासूनच सायरा बानू यांची प्रकृती खालावत गेल्याचे वृत्त समोर येत आहे.

दिलीप कुमार आणि सायरा बानो यांच्या वयात 22 वर्षांचे अंतर होते. परंतु, त्यांच्या प्रेमामुळे कधीही हे अंतर त्यांच्या नात्यात येऊ शकले नाही. सायरा नेहमीच दिलीपकुमार यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. त्यांनी नेहमीच सिद्ध केले. त्यांचे एकमेकांवरचे प्रेम खरे होते. सायराजींच्या आईने दिलीप कुमार यांना सायराशी लग्न करण्यास सांगितले होते. परंतु, वयाचे अंतर लक्षात घेता दिलीप कुमार या लग्नासाठी तयार नव्हते. पण, सायरांना दिलीप कुमारांशी लग्न करायचं इच्छा होती. दिलीपकुमार यांनी सायराला सांगितले की, तुला माझे पांढरे केस दिसत नाहीत का? पण सायराला काही फरक पडला नाही.

सायरा बानो यांना मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरुवातीच्या अहवालानुसार त्यांना तातडीने आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांना नेमकं काय झालं हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

नुकतेच काही दिवसांपूर्वी त्यांचे पती अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले होते. दिलीप कुमारांच्या जाण्याने सायरा बानो एकाकी झाल्या होत्या. अशातच आता त्यांची तब्येत बिघडल्याने चाहते देखील काळजीत पडले आहेत.

दिलीप कुमार यांच्या मृत्यूने सायरा बानो पूर्णपणे खचल्या होत्या. अभिनेत्याच्या अंत्यदर्शनाची काही छायाचित्रे समोर आली होती, जी खूप भावनिक होती. या फोटोंमध्ये अभिनेत्री सायरा पती दिलीप कुमार यांच्या पार्थिवाला शेवटच बिलगून धायमोकलून रडताना दिसल्या होत्या. मात्र, आता त्यांना लवकरात लवकर बरं वाटावं म्हणून चाहते प्रार्थना करत आहेत.

वयाच्या 17 व्या वर्षी सायरा बानो यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यांनी 1961 मध्ये शम्मी कपूरसोबत ‘जंगली’ चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी या चित्रपटात आपल्या अभिनयाची जादू अशा प्रकारे पसरवली की, त्यांची प्रतिमा रोमँटिक नायिकेची बनली. या चित्रपटासाठी सायराला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठीही नामांकन मिळाले होते.

You Might Also Like

तमिळ अभिनेते माधन बॉब यांचे निधन

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

TAGGED: #Actress #SairaBanu #hospital #treatment #ICU, #अभिनेत्री #सायराबानू #रुग्णालयात #आयसीयूमध्ये #उपचार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘त्या’ जखमी महिला अधिका-याची राज ठाकरे घेतली भेट
Next Article सप्टेंबरमध्ये देशात सरासरीपेक्षा पाऊस

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?