Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ऋषी कपूर यांच्या शर्माजी नमकीनचा फर्स्ट लूक प्रदर्शित
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुड

ऋषी कपूर यांच्या शर्माजी नमकीनचा फर्स्ट लूक प्रदर्शित

Surajya Digital
Last updated: 2021/09/05 at 10:48 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्या वाढदिवसानिमित्ताने ‘शर्माजी नमकीन’ या त्यांच्या आगामी चित्रपटाचे 2 पोस्टर रिलीज करण्यात आले आहेत. हे पोस्टर्स शेअर करताना मेकर्सने लिहिले, हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात नामांकित अभिनेते ऋषी कपूर यांचा एक विशेष चित्रपट शर्माजी नमकीनचे पोस्टर सादर करताना आम्हाला अभिमान वाटतो, ज्यांचे अनोखे काम आणि एक अद्भुत कारकीर्द नेहमीच आमच्याकडून जपली जाईल.

एक्सेल एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि मॅकगफिन पिक्चर्स निर्मित, चित्रपटाचे दिग्दर्शन नवोदित दिग्दर्शक हितेश भाटिया यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती रितेश सिधवानी, फरहान अख्तर, हनी त्रेहान, अभिषेक चौबे आणि कासिम जगमगिया यांनी सहनिर्मित केली आहे.

दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांची  जयंती होती. गेल्या वर्षी 30 एप्रिल रोजी ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप घेतला. आज ते या जगात नसले तरी त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून ते आजही जिवंत आहेत. दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्या जयंतीदिनाच्या निमित्ताने वडिलांच्या आठवणीत त्यांची मुलगी रिद्धिमा कपूर यांनी एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे.

 

या पोस्टमध्ये तिने वडील ऋषी कपूर यांच्यासोबतचा लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. ऋषी कपूर यांचा शेवटचा चित्रपट ठरलेल्या ‘शर्माजी नमकीन’चं फर्स्ट लूक आऊट झालंय.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांच्या जयंती दिनी त्यांचा शेवटचा चित्रपट ठरलेल्या ‘शर्माजी नमकीन’चं पोस्टर रिलीज करण्यात आलंय. यात दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांचा या चित्रपटातील फर्स्ट लूक आउट करण्यात आलाय. अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन झालं होतं, त्यावेळी त्यांनी या चित्रपटातील बऱ्याच भागाचं शूट केलं होतं. ऋषी कपूर यांच्या या चित्रपटासाठी फॅन्स देखील गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा करत होते. परंतू करोना परिस्थितीमुळे या चित्रपटाच्या रिलीजला उशिर झाला होता. हा चित्रपट गेल्याच वर्षी याच तारखेला रिलीज करण्यात येणार होता.

‘शर्मा जी नमकीन’ या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सर्दीचा माहौल दाखवण्यात आलाय. चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये ऋषी कपूर यांनी जर्सी परिधान करत गळ्यात मफलर गुंडाळून अगदी मस्तीमध्ये चलताना दिसून येत आहेत. त्यांच्या हातात एक सूटकेस दिसून येतेय. तर दुसऱ्या पोस्टरमध्ये त्याच लोकेशन आणि लूकमध्ये अभिनेते परेश रावल सुद्धा दिसून येत आहेत. खरं तर अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनानंतर उरलेल्या भागाचं शूट अभिनेते परेश रावल यांनी पूर्ण केलंय. अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘शर्माजी नमकीन’ चित्रपटाचं पोस्टर रिलीज केलंय. त्यानंतर ऋषी कपूर यांची मुलगी रिद्धिमाने सुद्धा त्यांच्या शेवटच्या चित्रपटाचं पोस्टर केलंय.

You Might Also Like

तमिळ अभिनेते माधन बॉब यांचे निधन

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

TAGGED: #Firstlook #RishiKapoor #SharmajiNamkeen #screened, #ऋषीकपूर #शर्माजीनमकीन #फर्स्टलूक #प्रदर्शित
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article विमा नसल्यामुळे वाहनमालकास वैयक्तिकरित्या 1 कोटी 15 लाख भरपाई देण्याचा आदेश
Next Article माजी आमदाराच्या घरी चोरी, 100 तोळे सोनं लुटलं

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?