Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शिकलेल्या महिलांमध्ये लग्नाआधी मूल होण्याचं प्रमाण वाढतंय? सुशिक्षित महिलांमध्ये ऐतिहासिक बदल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot News

शिकलेल्या महिलांमध्ये लग्नाआधी मूल होण्याचं प्रमाण वाढतंय? सुशिक्षित महिलांमध्ये ऐतिहासिक बदल

Surajya Digital
Last updated: 2021/09/08 at 5:30 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

वॉशिंग्टन : अमेरिकेत प्रोसिडिंग्स ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स  जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातील सामाजिक शास्त्रज्ञाने केलेला एक अभ्यास अहवाल प्रकाशित केला आहे. ज्यामध्ये सुशिक्षित महिलांना लग्नापूर्वी त्यांचे पहिले मूल हवे आहे. ही इच्छा असणाऱ्या महिलांची संख्या वाढली आहे. तसेच ज्या महिलांनी पदवी मिळवली आहे, त्या महिलांनी आपल्या दुसऱ्या मुलाच्या जन्माआधी अथवा पहिल्या मुलाच्या जन्मानंतर लग्न करणं पसंत केलं आहे.

एका अभ्यासानुसार, सुशिक्षित महिलांना आता लग्नापूर्वी त्यांचे पहिले मूल हवे आहे. ही इच्छा असणाऱ्या महिलांची संख्या वाढत आहे.  हा अभ्यास जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातील सामाजिक शास्त्रज्ञाने केला आहे. सुशिक्षित महिलांमध्ये हा ऐतिहासिक बदल होत असल्याचा त्यांचा दावा आहे.  ९० च्या दशकात हे प्रमाण इतकं नव्हतं. एका माध्यमाने या अभ्यासाबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाचे समाजशास्त्रज्ञ अँड्र्यू शर्लिन म्हणाले की, ज्या महिलांनी पदवी मिळवली आहे, त्या महिलांनी आपल्या दुसऱ्या मुलाच्या जन्माआधी अथवा पहिल्या मुलाच्या जन्मानंतर लग्न करणं पसंत केलं.  महाविद्यालयीन शिक्षण घेतलेल्या महिला ज्या सध्या वयाच्या ३० वर्षांच्या पुढे आहेत, त्यापैकी १८ ते २७ टक्के महिला आपल्या पहिल्या मुलाच्या जन्माआधी अविवाहित नव्हत्या. प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशल अकॅडमी ऑफ सायन्सने हा अभ्यास प्रकाशित केला आहे.

* अशा महिलांच्या प्रमाणात सहापटीने वाढ

हा अभ्यास वेगवेगळ्या पद्धतीचं शिक्षण घेतलेल्या महिलांच्या मदतीने करण्यात आला आहे. लग्नाआधी आपलं पहिलं मूल जन्माला घालणाऱ्या महिला या पदवीधारक आहेत किंवा त्याच्या बरोबरीचा एखादा डिप्लोमा त्यांनी केला आहे. १९९६ साली कॉलेजमध्ये शिकत असलेल्या आत्ता साधारण ३० वर्षांच्या आसपास वय असलेल्या ४ टक्के महिला आपल्या पहिल्या मुलाच्या जन्मावेळी अविवाहित होत्या. तर २० वर्षांनंतर अशा शिकलेल्या महिलांमध्ये लग्नाआधी मूल होण्याचं प्रमाण वाढतंय.  आता हे प्रमाण सहा पटीने वाढले आहे. आता हे प्रमाण ४ टक्क्यांहून २४.५ टक्क्यांवर आलं आहे.

* एकल पालकत्व संस्कृती वाढतीय

अमेरिकेतल्या महिलांसोबत हा अभ्यास करण्यात आला. कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेल्या युवकांसाठी लग्न आणि त्याबद्दलच्या संकल्पनांमध्ये झालेले बदल हे या मोठ्या परिवर्तनाला कारणीभूत असावेत, असा अभ्यासकांचा अंदाज आहे. आर्थिक समस्या हेही यामागचं एक कारण असण्याची शक्यता आहे. कुटुंब वाढवण्यासाठी, जबाबदारी घेण्यासाठी पैश्यांची गरज असते. कॉलेजसाठी, शिक्षणासाठी घेतलेलं कर्ज आणि पोटापाण्याची साधनं मर्यादित असल्याने त्यांना कुटुंब तयार करण्यासाठी वेळ लागतो. याच कारणामुळे अमेरिकेत सध्या एकल पालकत्व संस्कृती वाढत चालली आहे. त्याचबरोबर लग्नाशिवाय एकत्र राहणाऱ्यांचं प्रमाणही वाढत आहे. याउलट कमी शिकलेल्या महिलांचं लग्न आपल्या अपेक्षेप्रमाणे झालं नसलं तरीही त्या आपलं लग्न टिकवतात आणि तसंच आपलं आयुष्य जगतात. पण त्यांच्यातही काहीवेळा लग्नाआधी एक मूल झालेलं असतं.

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #learned #women #before #marriage #child #proportion #increasing #historical #change, #शिकलेल्या #महिलांमध्ये #लग्नाआधी #मूल #प्रमाण #वाढतय #ऐतिहासिक #बदल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article एका माशामुळे मच्छीमार झाला लखपती! असा कसला मासा वाचा
Next Article मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना गुडन्यूज, एमएसपीमध्ये वाढ

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?