वॉशिंग्टन : ब्रिटन, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी विशेष संरक्षण कराराची घोषणा केली आहे. चीनचा मुकाबला करण्यासाठी ते एकत्र आलेत. यानुसार हे देश प्रगत संरक्षण तंत्रज्ञान एकमेकांना देणार आहेत. या करारामुळे ऑस्ट्रेलिया पहिल्यांदा आण्विक ऊर्जेने चालणाऱ्या पाणबुडीची निर्मिती करणार आहे. या कराराला ‘ऑकस’ असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस, क्वांटम टेक्नॉलॉजी आणि सायबर सहकार्याचाही समावेश आहे.
साम्राज्य विस्तार करण्यासाठी सातत्यानं विविध देशांशी वाद उकरून काढणाऱ्या चीनची चिंता एका अहवालामुळे वाढली आहे. गेल्या काही दशकांपासून शस्त्रसज्जतेवर भर देणाऱ्या आणि अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज असलेल्या चिनी सैन्याची चिंता वाढवणारा अहवाल अमेरिकेच्या एका मासिकानं प्रसिद्ध केला आहे. चिनी सैन्य जास्त उंचीवर असलेल्या भागांमध्ये युद्ध लढू शकत नाही, अशा आशयाचा अहवाल नॅशनल इंटरेस्ट या मासिकानं प्रसिद्ध केला आहे.
ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेने मिळून ‘ऑकस’ नावाचा संरक्षण गट स्थापन केला आहे. भारतीय प्रशांत क्षेत्रातील आपापल्या हितसंबंधांचे संरक्षण करण्यासाठी हा गट कार्यरत असणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या गटांतर्गत परस्परांना संरक्षण सहकार्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्रशांत क्षेत्रात समुद्रावर चीनचा प्रभाव रोखण्यासाठी या गटाचा प्रथम कार्यक्रमांतर्गत ब्रिटन आणि अमेरिकेच्या सहकार्याने ऑस्ट्रेलिया आण्विक पाणबुडी विकसित करणार आहे.
‘ऑकस’ हा गट तिन्ही देशांच्या प्रमुख नेत्यांद्वारे आभासी पद्धतीने आयोजित एका बैठकीत स्थापन करण्यात आला. या तिन्ही देशानंनी तंत्रज्ञानाचे सहकार्य आणि संयुक्तपणे संरक्षण विकास कार्यक्रम राबवणे, सुरक्षा आणि संरक्षण-संबंधित विज्ञान, तंत्रज्ञान, औद्योगिक तळ आणि पुरवठा साखळी यांचे सखोल एकत्रीकरण करण्याचे मान्य केले आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान बरीस जॉन्सन, अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी आभासी पद्धतीने या बैठकीत या गटाच्या स्थापनेवर शिक्कामोर्तब केले आहे. पुढील 18 महिन्यांच्या कालावधीमध्ये ‘ऑकस’ गटाच्या माध्यमातून भारतीय 0 प्रशांत क्षेत्रात सामर्थ्य समतोल साधण्यासाठी भागीदारी आणि सहकार्यावर भर दिला जाणार आहे, असे या तिन्ही नेत्यांनी संयुक्त पणे प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.