काबूल : अफगाणिस्तानच्या कुंदूज प्रांतातील मशिदीत भयंकर बॉम्बस्फोट झाला आहे. यात 100 लोकांचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण जखमी झाले आहेत. तालिबानमधील एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. अजून कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली नाही. दरम्यान, मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
पुन्हा एकदा एका मोठ्या बॉम्बस्फोठाने अफगाणिस्तान हदरलंय. अफगाणिस्तानच्या कुंदुज प्रांतात आज शुक्रवारी मोठा स्फोट झाला. या अपघातात आतापर्यंत शंभरपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी झाले आहेत. स्थानिक प्रशासनाच्या माहितीनुसार, हा स्फोट शिया मशिदीजवळ झाला. मृताची संख्या दुपारपर्यंत 59 होती. त्यात आणखी वाढ झाली असून हा आकडा शंभरापर्यत गेला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
याअगोदर 3 ऑक्टोबर रोजी काबुलमधील एका मशिदीबाहेर जीवघेणा बॉम्बस्फोट झाला होता. त्यात 5 नागरिक ठार झाले होते. तालिबानी अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, स्फोटात मृत्यू झालेले लोक तालिबानचा प्रवक्ता झबीहुल्ला मुजाहिदच्या आईच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी मशिदीत जमले होते. त्या हल्ल्याची कोणीही जबाबदारी घेतली नसली तरी, इस्लामिक स्टेटवर संशय आहे. ऑगस्ट महिन्यात काबुल ताब्यात घेतल्यापासून IS कडून तालिबानवर अनेक हल्ले करण्यात आले आहेत.
तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर आयएसकडून होणारे हल्ले वाढले आहेत. यापूर्वी 26 ऑगस्ट रोजी इस्लामिक स्टेटने काबुल विमानतळाबाहेर मोठा बॉम्बस्फोट घडवून आणला होता. त्यात 169 हून अधिक अफगाणी आणि 13 अमेरिकन सैनिक मारले गेले होते.