Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सुपरस्टार अभिनेता पुनीत राजकुमारचे निधन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
टॉलीवुडHot News

सुपरस्टार अभिनेता पुनीत राजकुमारचे निधन

Surajya Digital
Last updated: 2021/10/29 at 3:20 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

बंगळुरु : साऊथ सुपरस्टार अभिनेता पुनीत राजकुमारचे आज निधन झाले आहे. तो 46 वर्षांचा होता. हृदयविकाराचा झटका बसल्यानंतर पुनीतला आज बंगळुरुच्या विक्रम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान पुनीतने अखेरचा श्वास घेतला. पुनीतने 29 कन्नड चित्रपटात काम केले आहे. त्याला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला आहे. त्याचे डब केलेले हिंदी चित्रपटही मोठ्या प्रमाणावर पाहिले जातात.

कन्नड चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक अशी त्यांची ओळख होती. पुनीत राजकुमार यास आज शुक्रवारी सकाळी छातीत दुखू लागले. त्यानंतर त्यास जोराचा झटका आला. त्यांच्यावर तातडीने प्राथमिक उपचार करून त्यांना बेंगलोर येथे उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर डॉक्टरांची एक टीम उपचार करत होती. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. त्यांनी डॉक्टरांशी चर्चा केली. मात्र, काही वेळातच पुतीन यांचा मृत्यू झाला. दुपारी 1 ते 1.30 च्या सुमारास मृत्यू झाला. पुनीत राजकुमार हा कन्नड सुपरस्टार डॉ. राजकुमार यांचा सर्वात लहान मुलगा आणि प्रख्यात स्टार KFI शिवराज कुमार यांचा धाकटा भाऊ आहे.

पुनीत यास ‘अप्पू’ नावाने त्यांचे फॅन्स ओळखत होते. स्टार ॲक्टर राजकुमार यांचा मुलगा असलेल्या पुनीत यांनी आपल्या अभिनयाने वेगळी छाप उमटवली होती. त्यांनी 29 हून अधिक कन्नड सिनेमांमध्ये काम केले. कर्नाटक राज्य बेस्ट चाइल्ड अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित केले होते. चालीसुवा मोदगळू और येराडू नक्षत्रगालू या सिनेमांमध्ये त्यांच्या अभिनयामुळे त्यांनी चाहत्यांच्या ह्रदयात स्थान मिळविले होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

बालकलाकार म्हणून त्यांनी आपल्या सिनेमा करिअरला सुरुवात केली. बेस्ट चाइल्ड आर्टिस्टचा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाला होता. 2002 पासून पुनीत अप्पू नावाने फेमस झाले होते. ‘अभी’, ‘वीरा कन्नडिगा’, ‘अजय’, ‘अरासु’, ‘राम’, ‘हुडुगारु’ और ‘अनजनी पुत्र’ यांसारख्या गाजलेल्या सिनेमांत त्यांनी काम केले होते. त्यांचा शेवटचा सिनेमा ‘युवारथना’ या वर्षीच रिलीज झाला होता.

त्यांच्या निधनानंतर कन्नड सिनेसृष्टीसह बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हळहळ व्यक्त केली आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकार, दिग्दर्शक, क्रिकेटपटू यांच्यासह अनेकांनी त्यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. 1985 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बेट्टाडा हूवू’ चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला आहे. तसेच ‘चालिसुवा मोडागलू’ आणि ‘येराडू नक्षत्रगलू’ या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना कर्नाटक राज्याचा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला आहे.

You Might Also Like

तमिळ अभिनेते माधन बॉब यांचे निधन

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

TAGGED: #Superstar #Actor #PuneetRajkumar #passesaway, #सुपरस्टार #अभिनेता #पुनीतराजकुमार #निधन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अमित शाह यांचं ठरलंय? 100 आमदारांचे तिकीट कापण्याची तयारी
Next Article रजनी भडकुंबेंवरील अविश्वास ठरावास न्यायालयाची स्थगिती

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?