Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘जय भीम’ चित्रपटाला मोठी पसंती, एका सीनवरून गदारोळ, पहा व्हिडिओ
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुड

‘जय भीम’ चित्रपटाला मोठी पसंती, एका सीनवरून गदारोळ, पहा व्हिडिओ

Surajya Digital
Last updated: 2021/11/04 at 12:24 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

मुंबई : साऊथ सुपरस्टार अभिनेता सूर्याचा ‘जय भीम’ हा चित्रपट दोन नोव्हेंबरला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला आहे. समीक्षकांनीही या चित्रपटाला पसंती दिली आहे. तसेच रिव्ह्यू चांगले आले आहेत. सोशल मीडियावर अनेकजण याविषयी आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. ‘जय भीम’ हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे.

अन्यायाविरोधातील लढा या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आला आहे. ‘जय भीम’ या चित्रपटाला सध्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि अभिनेते कमल हासन यांनी चित्रपटाचे आणि स्टारकास्ट आणि क्रूचे कौतुक केले आहे. सूर्याचा उत्कृष्ट अभिनय लोकांची मने जिंकत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होताच चर्चेत आला आहे. ‘जय भीम’ हा चित्रपट तामिळ, तेलगू आणि हिंदीमध्ये रिलीज झाला आहे. हा चित्रपट १९९३ च्या सत्य घटनेवर आधारित आहे जिथे न्यायमूर्ती के चंद्रू यांनी अशीच एक केस लढवली होती.

जिथे पोलीस काही आदिवासी समाजातील पुरुषांना जबरदस्तीने घेऊन जातात. त्यांचा अतोनात छळ करतात आणि पडद्यावर असे दृश्य पाहून तुम्ही देखील रागाने दात चावू लागाल. पोलीस त्यांना न केलेल्या गुन्ह्याची कबुली देण्यास सांगतात. त्या आदिवासींपैकी एक म्हणजे राजकानू. ज्याची पत्नी आपल्या पतीला वाचवण्यासाठी चंद्रू नावाच्या वकिलाची मदत घेते. चंद्रू मानवाधिकार प्रकरणांवर विशेष लक्ष देतो. पण या प्रकरणाचा तळ गाठताना कोणते घृणास्पद सत्य समोर येते, ही या चित्रपटाची कथा आहे. एक असे सत्य, जे शतकानुशतके आपल्यासोबत आहे. आपण फक्त सोयीस्करपणे त्याच्यापासून नजर फिरवून घेतली आहे.

‘जय भीम’ हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. चित्रपटाला मास अपील देण्यासाठी काही भाग नाट्यमय करण्यात आले आहेत. ज्यांची काही ठिकाणी गरज वाटत नाही. यामुळेच चित्रपट काही भागांमध्ये संथ वाटू शकतो. हा चित्रपट त्यातील सामाजिक संदेशाला पुरेपूर न्याय देतो. अशा इतर विषयांवरील पूर्वीच्या चित्रपटांशी तुलना करणे शहाणपणाचे ठरणार नाही.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

केवळ पोलिसांच्या क्रूरतेचा विषय म्हणजे ‘जय भीम’ नाही. यातून पोलिसांच्या क्रूर हिंसाचाराला जन्म देणार्‍या मानसिकतेत शिरण्याचा प्रयत्न केला जातो. कथा त्या पूर्वग्रहांना समोर आणते, जे एकमेकांना समजण्यापलीकडे विचार करण्याचा अधिकार देतात. असा भेदभावाचा थीमवर आधारित अनेक अनेक सिनेमे याआधीही चर्चेत आले आहेत. जिथे ही थीम साधी ठेवली गेली होती. जेणेकरून प्रेक्षकांना स्वतःला यातील फरक जाणवू शकेल. पण ‘जय भीम’ असे करत नाही. उच्च आणि नीच असा भेदभाव सामान्यपणे न मांडता तो स्पष्टपणे समोर ठेवतो. जसे की या कथेत राजकनू साप पकडण्याचे काम करतो. एकदा गावातील एका प्रभावशाली माणसाचा नोकर त्याला बोलावायला येतो. त्याला त्याच्या मोपेडवर बसायला सांगतो. बसलेला असताना राजकनू आधारासाठी त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. याने चिडलेला तो व्यक्ती मागे वळून पाहतो. त्याच्या नजरेतच राजकनूला आपली चूक कळते आणि तो हात मागे घेतो.

* एका सीनवरून गदारोळ

टीजे ज्ञानवेल दिग्दर्शित या चित्रपटात दिग्गज अभिनेता प्रकाश राज याने एक महत्त्वाची भूमिका साकारली आहे. पण आता याच चित्रपटातील एका सीनवरून बराच गदारोळ सुरु झाला आहे.

We wait for Tamil films… We support them, we request the makers to release it Pan India, in return we don’t want anything but just love…. If not love then atleast not humiliation… 🙏

— Rohit Jaiswal (@rohitjswl01) November 1, 2021

एका सीनमध्ये प्रकाश राज हा हिंदी बोलणाऱ्या व्यक्तीला थेट कानशिलात लगावतो आणि त्याला तामिळमध्ये बोल असं सांगतो. दरम्यान, हाच सीन आता सोशल मीडियावर व्हायरल होता आहे आणि अनेकांनी या सीनवर आक्षेप घेतला आहे.

‘जय भीम’ सिनेमातील एका सीनमध्ये एक माणूस हा हिंदीत बोलत असताना प्रकाश राज त्याला जोरदार कानशिलात लगावतो. त्यावेळी तो व्यक्ती त्याला विचारतो की, तुम्हा मला कानशिलात का मारली? यावेळी उत्तर देताना प्रकाश राज त्याला म्हणतो की,- ‘तामिळमध्ये बोला.’ दरम्यान, याच सिनवरुन चित्रपट समीक्षक रोहित जसवाल यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. हा सीन पाहून आपल्याला कसं वाईट वाटलं हे त्यांनी ट्विटरवरुन सांगितलं आहे.

Prakash Raj with his propaganda in the movie ‘Jay Bhim’ where he slaps a person who speaks in Hindi. pic.twitter.com/1SwPVssbK7

— Amit Kumar Sindhi (@AMIT_GUJJU) November 2, 2021

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये असं म्हटलं आहे की, ‘आम्ही तामिळ चित्रपटांची वाट पाहतो. आम्ही त्यांना पाठिंबा देतो. आम्ही निर्मात्यांना संपूर्ण भारतात हा चित्रपट प्रदर्शित करण्याचे आवाहन करतो. त्या मोबदल्यात आम्हाला प्रेमाशिवाय काहीही नको असते. पण हा चित्रपट पाहिल्यानंतर मला अतिशय वाईट वाटलं. अभिनेता किंवा कोणाच्याही विरोधात काहीही चुकीचं वाटल नाही. पण अशा सीनची गरज नव्हती. निर्माते तो सीन काढून टाकतील अशी आशा आहे.’

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #Bigfavorite #movie #JaiBhim #commotion #scene #watch #video, #जयभीम #चित्रपट #मोठीपसंती #सीन #गदारोळ #पहाव्हिडिओ
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article वैरागमध्ये व्यापार्‍यांना मारुन दहशत माजविणार्‍यांविरोधात गुन्हा दाखल
Next Article संतांच्या पालखी मार्गाचा सोमवारी भूमिपूजन सोहळा, पंतप्रधानांची व्हीसीतून हजेरी

Latest News

ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला नव्याने टॅरिफ लावण्याची धमकी
देश - विदेश July 1, 2025
हिमाचल प्रदेशातील मंडी येथे ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान
Top News July 1, 2025
इस्रोतील माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ विजय पेंडसे यांचे निधन
देश - विदेश July 1, 2025
महाराष्ट्रातील भाजपा कार्यकर्त्यांना लाभणार रवी नामक ‘दादा’ !
राजकारण July 1, 2025
तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?