Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पूरग्रस्तांसाठी प्रभासने दिली 1 कोटींची मदत
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुड

पूरग्रस्तांसाठी प्रभासने दिली 1 कोटींची मदत

Surajya Digital
Last updated: 2021/12/08 at 10:03 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : ‘बाहुबली’फेम अभिनेता प्रभासने मंगळवारी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री मदत निधीमध्ये 1 कोटी रुपयांची मदत जमा केली आहे. आंध्र प्रदेशातील अनेक भागात गेल्या 2 आठवड्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेकांना फटका बसला. त्यांच्या मदतीसाठी प्रभासने मदतीचा हात पुढे केला आहे. दरम्यान मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे आंध्र प्रदेशातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली. अशा परिस्थितीत पीडितांना मदतीचा हात पुढे करताना प्रभासने एक कोटी रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला. प्रभासच्या या पावलामुळे त्याचे चाहते खूप खूश आहेत.

प्रभासच्या आधी साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी त्यांच्या वतीने आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री मदत निधीमध्ये २५-२५ लाख रुपये दान केले आहेत. ‘राधे श्याम’ अभिनेत्यापूर्वी सुपरस्टार चिरंजीवी, त्याचा मुलगा आणि कलाकार राम चरण, ज्युनियर एनटीआर, महेश बाबू आणि अल्लू अर्जुन आदी अनेक कलाकारांनी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्यांना दान दिले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

तसा प्रभास महागड्या कार भारीच  शौकीन आहे. सर्वात महागडी कार अभिनेता  शाहरुख  खान नंतर प्रभासकडे आहे. त्याची किंमत 12 कोटी आहे.

साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांनी प्रभावित लोकांना मदत केल्याने त्यांच्या चाहत्यांना खूप आवडले आहे. या कलाकारांचे चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर प्रभास लवकरच त्याच्या आगामी ‘राधे श्याम’ या चित्रपटात पूजा हेगडेसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. हा चित्रपट १४ जानेवारी २०२२ रोजी संक्रांतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात प्रभास एक अशी व्यक्तिरेखा साकारत आहे जी त्याने यापूर्वी कधीही साकारली नव्हती. विशेष म्हणजे प्रभासचे चाहते त्याचा चित्रपट पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत.

चित्रपटाची दोन गाणीही प्रदर्शित झाली आहेत. ‘आशिकी आ गई’ या गाण्यात प्रभास आणि पूजाची रोमँटिक लव्हस्टोरी पाहायला मिळते, तर ‘सोच लिया’ हे गाणे दोन तुटलेल्या हृदयांच्या वेदनांची कहाणी सांगते. या चित्रपटातील गाण्यांनी चाहत्यांमध्ये आतापासूनच उत्सुकता वाढवली आहे. आता तो फक्त या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहे. या चित्रपटाशिवाय प्रभासचा ‘आदिपुरुष’ हा चित्रपटही प्रदर्शित होण्याच्या तयारीत आहे. या चित्रपटाचे शूटींग संपले आहे, मात्र त्याची प्रदर्शन डेट अजून जाहीर झालेली नाही.

You Might Also Like

तमिळ अभिनेते माधन बॉब यांचे निधन

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

TAGGED: #Prabha #provided #1crore #flood #victims, #पूरग्रस्तांसाठी #प्रभास #1कोटींची #मदत
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article उस्मानाबादेत दोन एसटी बसवर दगडफेक, काचा फोडल्या
Next Article ‘निमगाव’ची सायकल बॅंक ठरली ५० मुलींचा आधार ..!

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?