Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: रावत यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी; दिग्दर्शक अली अकबरांनी सोडला मुस्लिम धर्म
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुड

रावत यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी; दिग्दर्शक अली अकबरांनी सोडला मुस्लिम धर्म

Surajya Digital
Last updated: 2021/12/11 at 6:57 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

चेन्नई : प्रसिद्ध मल्याळी दिग्दर्शक अली अकबर यांनी मुस्लीम धर्माचा त्याग केलाय. सीडीएस बिपीन रावत यांच्या निधनानंतर सोशल मीडियात काही कट्टरतावाद्यांनी आक्षेपार्ह टिपण्णी केली. त्यामुळे व्यथित झालेल्या अली अकबर यांनी मुस्लीम धर्म सोडण्याची घोषणा केली.

आपण हिंदू धर्म स्वीकारणार असल्याचं अली अकबर यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. जनरल रावत यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर काही लोकांनी स्मायली इमोजी टाकत प्रतिक्रिया दिली होती. आपलं नवं नाव रामसिंहन असेल असं त्यांनी जाहीर केलंय.

सीडीएस बिपीन रावत यांच्या मृत्युनंतर काही इस्लामवाद्यांकडून आनंद व्यक्त केल्याच्या निषेधार्थ अली अकबर यांनी इस्लाम धर्माचा त्याग केला. जनरल रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघातातील निधनाच्या पोस्ट आणि प्रतिक्रियांच्या खाली अनेक इस्लामवाद्यांनी स्मायली इमोजी वापरल्याने ते संतप्त झाले.

दिग्दर्शक अली अकबर यांनी यापूर्वी सीडीएस रावत यांच्या मृत्युबाबत आक्षेपार्ह मत व्यक्त करणार्‍या इस्लामवाद्यांवर टीका करणारा व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट केला होता. व्हिडीओवर आक्षेपार्ह कॉमेंट केल्यामुळे अकबर यांचे खाते एका महिन्यासाठी निलंबित करण्यात आले. त्यानंतर त्यांनी दुसरे खाते उघडून त्यावर इस्लाम सोडत असल्याचे जाहीर केले. ज्यांनी इमोजी टाकल्या, त्यांच्या विरोधात बोलल्यानंतर पाच मिनिटांतच खाते ब्लॉक करण्यात आले, असे त्यांनी सांगितले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मोठ्या इस्लामिक नेत्यांनीही शूर लष्करी अधिकार्‍यांचा अपमान करणार्‍या देशद्रोही अशा कृतींना विरोध केला नाही, हे आपण स्वीकारू शकत नाही. आपला धर्मावरील विश्वास उडाला आहे. त्यांनी फेसबुकवर या संबंधित व्हिडीओ पोस्ट केला आहे. आजपासून मी मुस्लिम नाही. मी भारतीय आहे. भारताविरुद्ध इमोजी पोस्ट करणार्‍या लोकांना हेच माझे उत्तर आहे, असे अकबर यांनी व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

अकबर यांना वाढता पाठिंबा या पोस्टवर फेसबुकवरील मुस्लिम समाजाकडून तीव्र टीका झाली आणि काहींनी अपमानास्पद भाषाही वापरली. दरम्यान, अनेक वापरकर्त्यांनी अकबर यांना पाठिंबा दिला आणि त्यांना शिवीगाळ करणार्‍यांना फटकारले. ही पोस्ट नंतर फेसबुकवरून काढून टाकण्यात आली असली तरी, ती व्हॉट्सअ‍ॅपवर मोठ्या प्रमाणावर शेअर केली जात आहे.

नंतर, अकबर यांनी आणखी एक पोस्ट केली ज्यामध्ये त्यांनी म्हटले, सीडीएसच्या मृत्यूवर हसणार्‍यांची ओळख पटवून शिक्षा केली पाहिजे.

सीडीएस बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्युबाबत समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह वक्तव्य करणार्‍या जावेद खानला अटक करण्यात आली. तो जयपूर येथील नझरबाग मार्गावर राहतो. त्याचा शोध घेण्यासाठी चार पथके तयार करण्यात आली होती. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायदंडाधिकार्‍यांनी दिला आहे, अशी माहिती पोलिस अधिकार्‍यांनी दिली.

You Might Also Like

तमिळ अभिनेते माधन बॉब यांचे निधन

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

TAGGED: #Offensive #remarks #Rawat #Director #AliAkbar #leaves #Islam, #बिपीनरावत #आक्षेपार्ह #टिप्पणी #दिग्दर्शक #अलीअकबर #सोडला #मुस्लिम #धर्म
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर, औरंगाबाद, वाशिममधील गुन्हे उघडकीस; नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त
Next Article मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या बांधवांच्या वारसांना मिळणार नोकरी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?