Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राष्ट्रपतीने दिले ‘नरकाचं द्वार’ बंद करण्याचे आदेश, खड्ड्यात सातत्याने आग
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot News

राष्ट्रपतीने दिले ‘नरकाचं द्वार’ बंद करण्याचे आदेश, खड्ड्यात सातत्याने आग

Surajya Digital
Last updated: 2022/01/11 at 6:31 PM
Surajya Digital
Share
5 Min Read
SHARE

अश्गाबत : तुर्कमेनिस्तानच्या (Turkmenistan) उत्तरेला खड्ड्यांमधून मिथून वायूची गळती (Gas leak) होऊन तो पर्यावरणात पसरेल. त्यामुळे त्यापैकी एका खड्डयात आग (Fire in the pit) लावण्यात आली. या खड्डयाला ‘नरकाचं द्वार’ (Gates of Hell) नाव देण्यात आले. तुर्कमेनिस्तानच्या राष्ट्रपती गुरबांगुली बर्डीमुखामेदोव्ह यांनी आता हा खड्डा बुजवण्याचा आदेश दिला आहे. या खड्ड्यात सातत्याने आग सुरू असते. ते पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने पर्यटक तिथे भेट देत असतात.

तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये, टीव्ही मालिकांमध्ये पाहिलं असेल की पृथ्वीबरोबरच स्वर्ग आणि नरकही अस्तित्वात आहे. स्वर्गामध्ये सर्वकाही छान गोष्टी असतात तर नरकामध्ये कायम आग धगधगत असते असं सांगितलं जातं. मात्र पृथ्वीवर खरोखरच नरकाचं द्वार म्हणावली जाणारी एक जागा आहे असं तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल ना? पण ज्याप्रमाणे नरक या संकल्पनेनुसार ज्या ठिकाणी कायम आग धगधगत असते त्या नरकाचा दरवाजा म्हणून तुर्कमेनिस्तानमधील एक जागा जगप्रसिद्ध आहे.

मात्र लवकरच हा नरकाचा दरवाजा कायमचा बंद होणार आहे. म्हणजेच ही धगधगणारी आग विझवली जाणार आहे. तुर्कमेनिस्तानचे राष्ट्रपती (President) गुरबांगुली बर्दीमुहामेदोव यांनी नुकताच या नरकाच्या दरवाजासंदर्भात मोठा धक्कादायक निर्णय घेतलाय.

तुर्कमेनिस्तानमध्ये असणारी जी जागा नरकाचे द्वार म्हणून ओळखली जाते ती एक मोठ्या आकाराचा क्रेटर म्हणजेच खड्डा आहे. हा खड्डा २३० फूट रुंद, २० मीटरहून अधिक खोल असून तो अगदी अंतराळामधूनही दिसतो.

या फोटोमध्ये खड्ड्याच्या बाजूने एक गाडी जाताना दिसतेय. त्यावरुन त्याच्या आकाराचा अंदाज बांधता येईल. मागील ५० वर्षांपासून या खड्ड्यामध्ये आग धगधगत आहे असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. मात्र आता राष्ट्रपती गुरबांगुली यांनी हा खड्डा बुजवण्याचे म्हणजेच ही आग कायमची शांत करण्याचे आदेश दिलेत.(President orders closure of ‘Gates of Hell’, continuous fire in the pit)

Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

गुलबांगुली यांनी आपल्या मंत्र्यांना आदेश दिले आहेत की त्यांनी जगातील या क्षेत्रामधील तज्ज्ञांना शोधून हा खड्डा कायमचा बुजवावा. पण हे असे आदेश देण्यामागे विशेष कारण आहे. हा मोठ्या आकाराचा (Large size)  खड्डा म्हणजेच क्रेटर काराकुमच्या वाळवंटामध्ये आहे. ही जागा अश्गाबत शहरापासून १६० मैलांवर आहे.

मागील ५० वर्षांपासून सतत आग धगधगत असल्याने या खड्ड्याला ‘माऊथ ऑफ हेल’ किंवा ‘गेट ऑफ हेल’ असंही म्हटलं जातं. बरं, ही नरकाचं द्वार म्हणून ओळखलं जाणारी आग कशी लागली याचा किस्साही मोठा रंगतदार असल्याचं सांगितलं जातं.

हा खड्डा आधीपासून येथे नव्हता. असा दावा केला जातो की शित युद्धाच्या कालावधीमध्ये सोव्हिएत संघाची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. मात्र याच संकटामधून या खड्ड्याची निर्मिती झाली. सोव्हिएत संघाला १९७१ नैसर्गिक गॅस आणि तेलाची आवश्यकता होती म्हणून त्यांनी जो खड्डा खोदण्यास सुरुवात केली त्यातूनच या खड्ड्याची निर्मिती झाली. (Orders have been issued to extinguish the fire in this pit for the last 50 years)

वैज्ञानिकांच्या मदतीने खोदकाम करुन खनिज तेल शोधण्यास सोव्हिएत संघाने सुरुवात केली. त्यांना नैसर्गिक गॅस तर मिळाला. मात्र ती जागा एवढ्या मोठ्या प्रमाणात खचली की हा खड्डा तयार झाला. या खड्ड्यामधून मिथेन वायूचा उत्सर्जन होत होतं. त्यामुळे येथील हवा प्रदुषित होऊ नये म्हणून हा वायू जाळून संपवण्याचा निर्णय घेत येथे आग लावण्यात आली.

गॅस (Gas) संपल्यावर आग विझेल असा अंदाज (guess) होता. मात्र असं आजपर्यंत तरी झालेलं नाही. त्यामुळेच तेव्हा लागलेली आग ही तेथून उत्सर्जित होणाऱ्या मिथेनमुळे मागील ५० वर्षांहून अधिक काळापासून या खड्ड्यामध्ये आग धगधगत (continuous fire in the pit) आहे. मात्र या दाव्याचे ठोस असे पुरावे उपलब्ध नसल्याचं सांगितलं जातं. तरीही हा खड्डा पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे.

मागील ५० वर्षांपासून (50 years ago) दिवस रात्र (day night) येथे आग सतत धगधगत असून तिला विझवण्यात यापूर्वी अनेकदा अपयश आलं आहे. त्यामुळेच आता राष्ट्रपतींनी वायू प्रदुषणाचा (Air pollution) मुद्दा लक्षात घेत हा खड्डा कायमचा बुजवण्याचा आदेश दिलाय. आता खरोखरच राष्ट्राध्यक्षांच्या आदेशाप्रमाणे तज्ज्ञ मंडळी शोधून हा जगप्रसिद्ध खड्डा (The world famous pit) बुजवण्यात यश येतं की पुढील अनेक वर्ष हा असाच जळत राहतो, हे येणारा काळच सांगेल. मात्र या आदेशामुळे हा खड्डा पुन्हा चर्चेत आला आहे.

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #President #orders #closure #GatesofHell #continuous #fire #pit, #राष्ट्रपती #नरकाचंद्वार #बंद #आदेश #खड्ड्यात #सातत्याने #आग
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कर्ज न दिल्याने संतापलेल्या व्यक्तीने बँकेला लावली आग
Next Article सांगलीत जन्मलेल्या ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त वि.स.खांडेकरांविषयी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?