मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा व निक जोनस Actress Priyanka Chopra and Nick Jonas सरोगसीच्या माध्यमातून आई-बाबा झाले आहेत. सध्या प्रियांकाचे बाळ रुग्णालयात आहे. ते २७ व्या आठवड्यात जन्माला आले आहे. नियोजनानुसार बाळाचा जन्म एप्रिल महिन्यात होणार होता. मात्र त्याआधीच जन्म झाल्यानं बाळाला डॉक्टरांच्या देखरेखीखाली काही दिवस रुग्णालयातच ठेवण्यात येणार आहे. दरम्यान प्रियांकाला तिचे चाहते सोशल मीडियाच्या social media माध्यमातून शुभेच्छा देत आहेत.
प्रियांका चोप्रा आणि निक जोनस सरोगसीच्या माध्यमातून आई-बाबा झाले आहेत. अर्थात प्रियांकानं सरोगसीच्या माध्यमातून मुलीचा जन्म झालाय की मुलाचा हे सांगितलेलं नाही. प्रियांका आणि निकच्या बाळ सध्या रुग्णालयात असून आणखी काही दिवस त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवलं जाणार आहे.
‘डेली मेल’नं यासंबंधी वृत्त प्रसारित केलं आहे. प्रियांका चोप्राशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांचं बाळ २७ व्या आठवड्यात जन्माला आलं आहे. बाळ आणि सरोगेट आई कॅलिफोर्नियाच्या एका रुग्णालयात आहेत. त्या महिलेची ही पाचवी सरोगसी आहे.
नियोजनानुसार बाळाचा जन्म एप्रिल महिन्यात होणार होता. मात्र त्या आधीच त्याचा जन्म झाल्यानं बाळाला रुग्णालयातच ठेवण्यात आलं आहे. तसेच आणखी काही दिवस त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेण्यात येणार आहे.Surrogacy baby, Priyanka Chopra’s baby will remain in hospital for a few days
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
प्रियांकाच्या आधीही बॉलिवूडमधल्या काही अभिनेत्रींनी सरोगसीद्वारे बाळाला जन्म दिला. शाहरुख खान-गौरी, शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा, आमिर खान-किरण राव, तुषार कपूर, एकता कपूर, करण जोहर, सनी लिओनी-डॅनिअल, प्रिती झिंटा-झिन Shahrukh Khan-Gauri, Shilpa Shetty-Raj Kundra, Aamir Khan-Kiran Rao, Tusshar Kapoor, Ekta Kapoor, Karan Johar, Sunny Leone-Daniel, Preity Zinta-Zinn या सेलिब्रिटींचा त्यामध्ये समावेश आहे.
प्रियांका चोप्रानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहून आई झाल्याची गोड बातमी सर्वांसोबत शेअर केली. तिनं लिहिलं, ‘आम्ही सरोगसीच्याद्वारे बाळाचं स्वागत केलं आहे, हे सांगताना आम्हाला खूप आनंद होत आहे. हे क्षण आमच्यासाठी अतिशय खास आहेत आणि आम्हाला प्रायव्हसीची गरज आहे. कुटुंबासाठी वेळ द्यायचा आहे. आमच्या भावनांचा आदर कराल अशी अपेक्षा आहे. खूप खूप धन्यवाद.’ आपल्या या पोस्टमध्ये तिनं निक जोनसला टॅग tag केलं आहे. पण या पोस्टमध्ये तिनं मुलगा की मुलगी हे स्पष्ट केलेलं नाही.
दरम्यान प्रियांकाच्या सोशल मीडिया पोस्ट बॉलिवूड आणि हॉलिवूड सेलिब्रेटींनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. केविन जोनस, जो जोनस, सोफी टर्नर, लारा दत्ता, शेफाली शाह, भूमि पेडणेकर Kevin Jonas, Joe Jonas, Sophie Turner, Lara Dutta, Shefali Shah, Bhoomi Pednekar यांच्यासह इतर अनेक कलाकारांनी प्रियांकाच्या इन्स्टाग्राम पोस्टवर कमेंट केल्या आहेत. प्रियांका आणि निकचं हे पहिलंच अपत्य आहे. २०१८ मध्ये त्यांचा विवाह झालेला होता.
२०१७ मध्ये ‘मेट गाला’मध्ये एकत्र हजेरी लावल्यानंतर अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनासने त्यांचं नातं जगजाहीर केलं. वर्षभर एकमेकांना डेट केल्यानंतर दोघं लग्नबंधनात अडकले. या दोघांनी १ डिसेंबर २०१८ रोजी राजस्थानमध्ये लग्न केलं. प्रियांकाला प्रपोजल रिंग घेण्यासाठी निकने लंडनमधील नामांकित ज्वेलरीचं दुकान बंद करायला लावलं होतं. त्यानंतर निकने प्रियांकाला तिच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी फिरायला गेले असताना प्रपोज केलं.