नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनच्या दोन वेगळ्या भागांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे. तसेच या ठिकाणी आपले सैनिक पाठवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर हा आदेश म्हणजे युक्रेनवर रशियाचा हल्ला सुरू झाला आहे, युक्रेनसाठी हे खूप धोकादायक आहे, असे ब्रिटनने म्हटले. आम्ही हे स्वीकार करणार नाही, रशियाविरुद्ध कठोर कारवाई करु, असा इशारा ब्रिटनचे मंत्री साजिद जाविद यांनी दिला आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी युक्रेनमधील दोन बंडखोर प्रातांना राष्ट्र म्हणून मान्यता दिली असल्याने या तणावात भर पडली असून युद्धाचे ढग आणखी गडद झाले आहेत. दरम्यान वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार रशियाने युक्रेनमध्ये घुसखोरी केल्यास मोठ्या प्रमाणात रक्तपात होऊ शकतो असा इशारा देण्यात आला आहे.
युद्ध टाळण्याचे प्रयत्न सुरु असताना पुतीन यांनी युक्रेनमधील दोन बंडखोर प्रांतांना राष्ट्राचा दर्जा दिल्याने तणाव आणखीनच वाढला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी युक्रेनमधील डॉनेत्स्क आणि लुहान्स्क या दोन प्रांतांना राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे. जनतेला संबोधित करताना त्यांनी ही घोषणा केली. रशियाच्या या निर्णयामुळे जगभरात खळबळ उडाली असून फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांकडून युद्ध टाळण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांनाही अपयश आलं आहे.
रशिया आणि युक्रेन या दोन देशांमधला तणाव आता वाढला असून युद्ध अटळ असल्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. या दोन्ही देशांच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जगातील सर्वच देशांना काही एक ठोस भूमिका घेणं गरजेचे आहे. त्यामुळे आता ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीही ब्रिटनची अधिकृत भूमिका जाहीर केली आहे. ‘द स्पेक्टॅटर इंडेक्स’ने दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटन युक्रेनला मदत करेल, असं सांगण्यात आलं आहे. Attack on Ukraine begins – Britain: the clouds of war darken
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
युक्रेनमधील लुहान्स्क आणि दोनेत्स्क या दोन प्रदेशांचे स्वातंत्र्य मान्य करण्याच्या रशियाच्या निर्णयावर अमेरिकेसह जगभरातील अनेक देशांनी आज जोरदार टीका केली. युक्रेनच्या सार्वभौमत्वावर आणि प्रादेशिक एकात्मतेवर हा हल्ला असल्याचे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी म्हटले आहे. रशियाकडून हल्ला होण्याबाबत अमेरिकेने वारंवार इशारा दिला होता.
रशियाची आताची कृती म्हणजे युक्रेनवर हल्ल्याची पूर्व तयारी असल्याचे मानले जात आहे. युक्रेनचे तुकडे करणारा रशियाचा निर्णय हा 2014 मध्ये केलेल्या मिन्स्क शांतता कराराचा भंग असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. ब्लिंकन म्हणाले की,”आंतरराष्ट्रीय कायद्यांचा आदर न करण्याची अध्यक्ष पुतीन यांची वृत्ती या घटनेतून स्पष्ट दिसत आहे. त्यांच्या या निर्णयाचा आम्ही निषेध करत आहोत. लोकशाहीचे पालन करण्याच्या रशियाच्या संसदेच्या दाव्याच्या विरोधात ही कृती असून यामुळे युक्रेनच्या सार्वभौमत्वावर आणि एकात्मतेवर उघड हल्ला आहे.”
दरम्यान, वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये अमेरिकेचं प्रतिनिधित्व करत असणाऱ्या राजदूत बाथशेबा नेल क्रोकर यांनी संयुक्त राष्ट्राचे मानवाधिकार उच्चायुक्त मिशेल बाचेलेट यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात रशियाचा मोठ्या हत्या करण्याचा कट असल्याचा त्यात नमूद केलय.
युद्ध संकेताचे परिणाम शेअर मार्केट वरही पडला आहे. आज मंगळवारी भारतीय शेअर बाजाराकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. मॉस्को शेअर बाजाराचा masco share bazar निर्देशांक RTS मध्ये रशियातील 50 मोठ्या कंपन्यांचे प्रतिनिधित्व करतो. मॉस्को शेअर बाजारात जवळपास 230 अंकांची म्हणजे 16.67 टक्क्यांनी कोसळून निर्देशांक 1160.24 अंकावर आला होता.
युद्ध तणावाच्या परिणामी रशियन रुबल हा डॉलरच्या तुलनेत आणखी कमकुवत झाला. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 78 रुबलपर्यंत घसरला होता. युद्ध सुरू झाल्यास रशियावर पाश्चिमात्य देशांकडून निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम रशियातील गुंतवणुकीवरही निश्चितच होणार आहे.