मुंबई : प्रसिद्ध अभिनेता सुशांत शेलार याच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. या प्रकरणात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे. दरम्यान, या बातमीने सुशांतच्या चाहत्यांनी काळजी व्यक्त केली असून सीसीटीव्ही फुटेज हाती लागल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. CCTV footage of actor Sushant Shelar throwing stones at his car
ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी सुशांत शेलार याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सुशांत शेलार यांच्या राहत्या घराच्याबाहेर ही घटना घडली आहे. रात्री 1.30 वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने येऊन कारवर दगड मारला. यात कारची समोरील काच पूर्णपणे फुटली आहे.
तसंच हा या इसमाने कारच्या समोर येऊन बेरिकेट्सही लावले आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. सुशांत शेलार याला याबद्दल विचारले असता त्यानेही हा भ्याड हल्ला असल्याचे सांगितले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/542061110804956/
या प्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याची प्रतिक्रिया दिली. “पहाटे दोनच्या दरम्यान एका अज्ञाताने गाडीवर हल्ला करून काच फोडली, हे कृत्य का केलं हे मला माहिती नाही पण मी याप्रकरणी रीतसर तक्रार दाखल करणार आहे.” असं अभिनेता सुशांत शेलार यांनी माध्यमाला बोलताना सांगितलं.
केतकी चितळेच्या फेसबुक पोस्टवर अभिनेता सुशांत शेलारनं नाराजी व्यक्त केली आहे. सुशांत म्हणाला,’ केतकीची फेसबुक पोस्ट पाहिल्यानंतर लाज वाटली. केतकीला याआधी ट्रोलिंग झालं, तेव्हा मित्र म्हणून तिच्या पाठीशी उभा होतो. त्यावेळी तिचे प्रकरण आम्ही विधानपरिषद उपसभापती निलम गोऱ्हे यांच्यापर्यंत घेऊन गेलो होतो. त्या सर्व प्रकियेमध्ये जाऊन देखील स्वत: केतकी चितळे असे भाष्य करत असेल तर निंदनीय आहे, असं मत मराठी अभिनेता सुशांत शेलार यांनी मांडले.
पुढे सुशांत म्हणाला,’ तिचे फेसबुकवरील पोस्टमधील विचार अतिशय वाईट आहेत. एवढंच नाही, तर तिच्या त्या पोस्ट बाबत मला काही बोलायचं नाही. नेहमी आम्ही कोणत्याही कलाकारांच्या पाठीशी उभे राहतो. अशा प्रकराचे पोस्ट लिहिणारे कलाकार चुकीचे आहेत, असेही मत सुशांत शेलार यांनी दिले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/542063150804752/