सोलापूर – शेतामध्ये पत्राशेड बसवण्याचे काम करताना लोखंडी शिडीला विद्युत वाहिनीचा स्पर्श लागून शॉक बसल्याने आमीन हसन शेख (वय ४२ रा.स्वागत नगर, सोलापूर) हे मजूर गंभीर जखमी होऊन मरण पावले. ही दुर्घटना कुरुल कामती (ता.मोहोळ) येथे बुधवारी (ता .1) दुपारच्या सुमारास घडली. A laborer from Solapur died due to electric shock
कुरुल कामती येथील श्रवण साबळे यांच्या शेतात पत्राशेड चे काम चालू होते. आमीन शेख हे लोखंडाच्या शिडीवरून काम करीत होते. अचानक शॉक बसल्याने ते खाली पडून गंभीर जखमी झाले. त्यांना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता ते उपचारापूर्वीच मरण पावले. मयत अमिन शेख यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. या घटनेची नोंद तालुका पोलिसात झाली आहे .
□ हॉटेलमध्ये मारहाण, ग्राहक जखमी
एमआयडीसी परिसरातील रसिक हॉटेल येथे बिल देण्याच्या वादातून काठी आणि हाताने केलेल्या मारहाणीत उमर चांद शेख (वय २५ रा. मित्रनगर शेळगी) हा जखमी झाला. ही घटना बुधवारी (ता. 1) पहाटेच्या सुमारास घडली. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. हॉटेलमधील रॉकी, लिंबोळे आणि अन्य १० ते १२ लोकांनी मारहाण केली. अशी नोंद एमआयडीसी पोलिसात झाली आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/553000539711013/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ शाळा न्यायाधिकरण सोलापुरातच राहणार : आमदार प्रणिती शिंदे
सोलापूर : सोलापुरातील शाळा न्यायाधिकरण बंद करण्याचा शिक्षण आणि क्रिडा विभागाचा निर्णय तूर्त स्थगीत करण्यात आला आहे. ही माहिती आ. प्रणिती शिंदे कार्यालयाच्यावतीनं देण्यात आली.
सोलापुरात उस्मानाबाद आणि नगर या जिल्ह्यांच शाळा न्यायाधिकरण गेली अनेकवर्ष सुरु आहे. मात्र अलिकडेच हे न्यायाधिकरण बंद करण्याचा आदेश निघाला होता. या संबंधात आ. प्रणिती शिंदे यांनी शिक्षण मंत्री श्रीमती वर्षा गायकवाड यांना पत्र देवून भेटून न्यायाधिकरण बंद न करण्याविषयी विनंती केली होती. सध्यस्थितीत १५० अपीलं या न्यायाधिकरणाकडे प्रलंबित आहेत.
तर रोज तिन्ही जिल्ह्यातून मिळून १५ वर अपिल दाखल होतात. शिक्षण मंत्री गायकवाड यांनी प्रणितींच्या पत्राची दखल घेवून हा निर्णय स्थगीत ठेवण्याबाबत संबंधीतांना आदेश दिले आहेत.
□ जुळे सोलापुरातील वैष्णवी प्लाझा समोरून दुचाकी लंपास
https://www.facebook.com/109399567404448/posts/553040613040339/