हैदराबाद : मराठी चित्रपट क्षेत्रापासून करिअरची सुरुवात करणारा आणि अनेक नाटकं, सवाई गाजवणारा निशिकांत कामत ( वय 50) यांचे निधन झाले आहे. निशिकांत कामत यांना लिव्हर अर्थात यकृताशी संबंधित आजारामुळे त्रास होता. त्यामुळे त्यांना 11 ऑगस्टपासून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
निशिकांत कामत याचा 2020 मध्ये नवा चित्रपट येणार आहे. सध्या त्याची तयारी सुरू आहे. दिग्दर्शनाबरोबरच निशिकांत कामतने अनेक चित्रपटांमध्ये अभिनयही केला आहे. याचे आज निधन झाले. हैदराबादमधील ‘एआयजी रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून निशिकांत कामत याच्यावर लिव्हर अर्थात यकृताशी संबंधित आजारामुळे हैदराबादमधील गच्चीबोली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. निशिकांत कामत यांना 31 जुलैला ताप आणि थकवा आल्याने एआयजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दिग्दर्शक निशिकांत कामत याने मराठी चित्रपट डोबिंवली फास्टपासून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. डोबिंवली फास्ट या चित्रपट प्रेक्षकांनी खूप पसंत केलं. त्यानंतर 2008 मध्ये ‘मुंबई मेरी जान’ या चित्रपटातही त्याचं काम पाहायला मिळालं. ‘डोंबिवली फास्ट’, ‘दृश्यम’, ‘लय भारी’ यासारख्या सुपरहिट सिनेमांचे दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील दृश्यम हा चित्रपट त्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा पैलू ठरला. या चित्रपटामुळे त्याचं खूप कौतुक केलं. अजय देवगन, तब्बू यांसारख्या मोठ्या कलाकारांसह केलेला या चित्रपटाने अनेक पुरस्कार पटकावले.