मोहोळ : मोहोळ नगर परिषदेच्या कार्यालयातून मागील आठ दिवसापूर्वी वसुलीच्या पैशातील ३५ हजार रुपये गायब होऊनही याबाबत वरिष्ठांनी दखल न घेतल्याने ना दाद ना फिर्याद अशी परिस्थिती संबंधित कर्मचाऱ्यांच्या बाबतीत झाली आहे. 35,000 missing from Mohol Municipal Council, no complaint or complaint, corporator’s crime
याबाबतची माहिती अशी की संगीता कुंभार ह्या मोहोळ नगर परिषदेमध्ये काम करतात. नगर परिषदेच्या ऑफिसमधील उतारे देणे त्याचबरोबर घरपट्टी पाणीपट्टीची वसुली करणे. यासारखी कामे त्या नियमित करत असतात. ४ जानेवारी रोजी बुधवारी वसुली करून आल्यानंतर ऑफिसमध्ये भरणा करण्यासाठी थांबल्या त्याचबरोबर पर्स मध्ये पैसे ठेवून बाकीची कामे ही त्यांनी केली. त्यानंतर त्यांनी ठेवलेले पैसे भरणा करण्यासाठी काढले असता त्यामध्ये त्यांनी मोजून लावून ठेवलेल्या नोटांमधून ३५ हजार रुपये कमी असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
याबाबत तातडीने ही बाब त्यांनी त्यांच्या वरिष्ठांच्या कानावर घातली वरिष्ठांनी या घटनेची शहानिशा न करता याबाबत विचारपूस न करता त्यांनाच पूर्ण रक्कम भरण्याची तंबी दिली. त्यांनी बाहेरून ३५ हजार रुपये आणून त्या रकमेची पूर्तता केली व त्या दिवशीचा भरणा पूर्ण केला परंतु नंतरच्या कालावधीमध्ये आठ दिवसांमध्ये कार्यालयामध्ये चोरी होऊन वरिष्ठांनी याबाबत कोणतीही दखल घेतली नाही.
कार्यालयामध्ये सीसीटीव्ही असतानाही भर दिवसा होणाऱ्या चोरीची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे या घटनेबाबत मोहोळ येथील नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ३५ हजार रुपये भर दिवसा पर्समधून काढून घेऊनही ना दाद ना फिर्याद अशी संगीता कुंभार यांची अवस्था झाली आहे. ही घटना त्यांनी स्वतः प्रतिनिधीशी संपर्क साधून या घटनेबाबत न्याय मिळवण्याची मागणी केली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
Visit us : https://surajyadigital.com
□ माजी नगरसेवक गंगेकरांवर गुन्हा दाखल
पंढरपूर : मागील भांडणाचा राग मनात धरून माजी नगरसेवक प्रताप गंगेकर याने अनिल नगर येथे एकास जबर मारहाण केली असून घटनेनंतर गंगेकर फरार आहे. प्रशांत अप्पा चौरे यांनी या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, रविवारी (ता. 8) सायंकाळी प्रशांत चौरे व विनायक सोनटक्के हे अनिल नगर येथील म्हसोबा मंदिरा जवळ गप्पा मारत असताना प्रताप गंगेकर व सागर लऊळकर हे त्या ठिकाणी आले. यावेळी गंगेकर याने चौरे यांना शिवीगाळ सुरू केली. तसेच गंगेकर याने तुम्ही गल्लीतील लोक लय माजलाय, निवडणूक होऊ द्या तुम्हाला एकेकाला गाठून खलास करतो अशी धमकी दिली.
चौरे यांनी दमदाटी का करता असे विचारले असता सागर लऊळकर याने हातातील लोखंडी कडे चौरे यांच्या गालावर मारले तर गंगेकर याने जवळच असलेल्या घराच्या पत्र्यावरील लाकडी दांडके काढून चौरे यांच्या नाका तोंडातून रक्त येईपर्यंत मारहाण केली.
दरम्यान सदर भांडण सोडवण्यासाठी चौरे यांची बहीण संगीता विलास साखरे मध्ये आली असता तिला देखील गंगेकर याने ढकलून दिले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात प्रताप गंगेकर व सागर लऊळकर या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून दोन दिवसापासून पोलीस त्यांना अटक करण्यासाठी शोध घेत आहेत. दरम्यान यापूर्वी देखील गंगेकर याच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले होते.