○ महाराष्ट्र सरकारने जनआरोग्य योजनेचा निर्णय मागे घ्यावा
बंगळुरू – कर्नाटकच्या बेळगावसह 865 मराठी भाषिक गावांवर महाराष्ट्राने दावा केला आहे. आता या गावात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना लागू करण्यात आली आहे. Stop schemes in border villages, Karnataka Chief Minister Basavaraj Bommai warns Eknath Shinde government पण याचा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी निषेध करत महाराष्ट्र सरकारला इशारा दिला आहे. “तुम्ही हा प्रकार त्वरित थांबा. जर हे थांबवले नाहीतर आम्ही महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात राहणाऱ्या कन्नड लोकांसाठी योजना सुरू करू”, असा त्यांनी इशारा दिला.
‘महाराष्ट्र सरकारने जनआरोग्य योजनेचा निर्णय मागे घ्यावा, असे आवाहन मी करतो. निर्णय मागे न घेतल्यास आम्हीही अशाच प्रकारचा निर्णय घेऊ,’ असा इशारा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्र सरकारला दिला आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातला सीमावाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारने जनआरोग्य योजनांचा लाभ शेजारच्या राज्यातील मराठी भाषिक ८६५ गावांपर्यंत पोहोचवण्यासाठी पावले उचलली आहेत. तसेच ‘कर्नाटकातील सीमावर्ती गावांतील लोकांना विमा देण्याच्या नावाखाली महाराष्ट्र सरकार त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अंतर्गत येत असल्याचे घोषणापत्र घेत आहे,’ असा आरोपही त्यांनी केला.
महाराष्ट्र सरकारचे हे वर्तन असेच सुरू राहिल्यास महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात राहणाऱ्या कन्नड लोकांच्या संरक्षणासाठी कर्नाटक सरकारही अशीच विमा योजना राबवेल.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● राज्यात 13 व 14 एप्रिल रोजी कोविड सज्जतेसाठी मॉक ड्रिल होणार
सोलापूर : राज्यात कोरोनाचा धोका वाढल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. कोरोनाचा मृत्यूदर 1.82% आहे. पुणे, सोलापूर, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा कोल्हापूर या सहा जिल्ह्यांत कोरोना वाढत असल्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले. म्हणून राज्यात 13 व 14 एप्रिल रोजी कोरोनासाठी मॉकड्रिल घेतले जाणार आहे. महाराष्ट्रात मास्कसक्ती केली नसून काळजी करण्याचे कारण नाही असे आवाहन सावंतांनी केले आहे.
राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कोविड सज्जतेसाठी १३ आणि १४ एप्रिल रोजी मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रार्दूभावामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून आता सातारा जिल्हयातील शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आणि गर्दीच्या ठिकाणी नागरिकांना मास्क अनिवार्य करण्यात आले आहे.
सोलापूर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरानाचे रुग्ण वाढत असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात नागरिकांना मास्क सक्ती करण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले की, कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पण हा सौम्य प्रकारातील कोरोना असून त्यामुळे घाबरून जाण्याची अजिबात आवश्यकता नाही. तरीही सर्वांनी योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.
सध्या राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर १३-१४ एप्रिल रोजी राज्यात मॉक ड्रील घेण्यात येणार आहे अशी माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मंगळवारी दिली. केंद्र सरकारने सूचना दिल्यानुसार, आम्ही १३-१४ एप्रिल रोजी राज्यात आपल्या कोविड सज्जतेसाठी मॉक ड्रिल घेणार असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.
महाराष्ट्रातील सर्व कोरोना रुग्णालयांकडून माहिती घेतली जात असून वेंटिलेटरच्या सपोर्टची अजून तरी गरज पडलेली नाही. सर्वात समाधानकारक बाब म्हणजे ४८-७२ तासांमध्ये कोरोना रुग्ण बरे होत आहेत. त्यामुळे जास्त घाबरण्याचे कारण नाही. याचे कारण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील डेल्टा व्हेरियंटसारखा सध्याचा कोराना प्राणघातक स्वरूपाचा नाही, असे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले आहे.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणाले की, सध्या तरी कोरोनाच्या वेगवेगळ्या चाचण्या करण्याची आवश्यकता वाटत नाही पण वासंर्दभात आम्हाला केंद्र सरकारकडून तशा प्रकारच्या सूचना आल्या तर तशी खबरदारी नक्कीच घेतली जाईल. तसेच कोरोनाच्या दोन्ही लसी टोचून घेतल्यानंतर बूस्टर डोस देण्यासंदर्भात केंद्राच्या निर्देशानुसार त्याचे पालन केले जाणार आहे, असेही आरोग्यमंत्र्यानी सांगितलं.
लोकसंख्येची घनता अधिक असलेल्या जिल्ह्यात रुग्णसंख्येचे प्रमाण अधिक असल्याचं दिसून येतंय. त्यामध्ये सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सिंधुदुर्ग, पुणे आणि सातारा या सहा जिल्ह्याचा समावेश आहे. ज्या भागात रुग्णसंख्येचे प्रमाण वाढत आहे त्या ठिकाणची लोकसंख्येची घनता अधिक आहे. यामध्ये पुणे, रायगड, ठाणे या जिल्ह्यांचा समावेश असून येथिल दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत वाढ पाहायला मिळत आहे.