Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून खबरदारी घेण्याचे नमुंमपाचे आवाहन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot News

उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून खबरदारी घेण्याचे नमुंमपाचे आवाहन

admin
Last updated: 2025/03/27 at 2:47 PM
admin
Share
4 Min Read
SHARE

नवी मुंबई, 27 मार्च (हिं.स.)।

मार्च महिन्यापासून राज्यातील अनेक भागात तापमान वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. हिट वेव्ह किंवा उष्णेतेची लाट ही एक मूक आपत्ती (सायलेंट डिझास्टर) आहे. साधारणपणे एखादया प्रदेशात सलग तीन दिवस नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा वातावरणातील तापमान 3 डिग्री सेल्सियसने जास्त असेल किंवा सलग दोन दिवसांसाठी 45 डिग्री सेल्सियस पेक्षा जास्त असेल तर त्याला उष्णतेची लाट असे संबोधतात. यामुळे माणसांसोबतच पक्षी, प्राणी, वनस्पती यांची होणारी हानी मोठी आहे. साधारणपणे मार्च ते मे या मान्सून पूर्वकाळात उष्णतेच्या लाटा येताना दिसतात.

अति उष्णतेच्या लाटेसाठी हवामान बदल आणि मानवी आरोग्यावरील राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग यांचेमार्फत खालीलप्रमाणे सल्ला देण्यात येतो.

हे’ करावे

1. तहान लागली नसली तरीही जेव्हा शक्य असेल तेव्हा पुरेसे पाणी प्यावे.

2. प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.

3. ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन (ORS) वापरावे आणि लिंबू पाणी, ताक लस्सी आणि फळांचे रस यांसारखी घरगुती पेये प्यावीत.

4. टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, कोशिंबीर तसेच स्थानिक उपलब्ध फळे आणि भाज्या यासारखी उच्च जलसामग्री असलेली हंगामी फळे आणि भाज्या खाव्यात.

5. पातळ, सैल, सुती आणि शक्यतो हलक्या रंगाचे कपडे घालावेत.

6. डोके झाकून ठेवावे. थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असताना छत्री, टोपी, टॉवेल आणि इतर पारंपारिक साधनांचा वापर करावा.

7. उन्हात बाहेर जाताना बूट किंवा चप्पल घालाव्यात.

8. हवेशीर आणि थंड ठिकाणी जास्त वेळ घालवावा.

9. थेट सूर्यप्रकाश आणि उष्णतेच्या लाटा रोखाव्या. दिवसा खिडक्या आणि पडदे बंद ठेवावेत, विशेषतः घराच्या सूर्यप्रकाशाच्या बाजूला थंड हवा येण्यासाठी त्यांना रात्री खिडक्या उघड्या कराव्यात.

10. स्वयंपाक करताना पुरेशा प्रमाणात हवा येण्यासाठी दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात.

11. घराबाहेर जात असाल, तर घराबाहेरील कामे शक्य असल्यास सकाळ आणि संध्याकाळ या वेळेच्या मर्यादेत करावीत.

12. दिवसाच्या थंड वेळांमध्ये बाहेरील कामांचे नियोजन करावे.

‘हे’ करू नये

1. उन्हात बाहेर पडणे, विशेषत: दुपारी १२:०० ते ०३:०० या वेळेत.

2. दुपारच्या वेळी बाहेर असताना कठोर परिश्रम करणे टाळावे.

3. अनवाणी बाहेर जाणे.

4. अल्कोहोल, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स किंवा मोठ्या प्रमाणात साखर असलेली पेय पिणे.

5. उच्च प्रथिनेयुक्त अन्न, आणि शिळे अन्न खाणे

6. उभ्या केलेल्या वाहनांमध्ये लहान मुले किंवा पाळीव प्राणी यांना एकटे सोडणे.

संवेदनशील किंवा जोखीमीचे घटक

लहान अर्भक आणि लहान मुले, घराबाहेर काम करणारे लोक, गर्भवती महिला, ज्यांना मानसिक आजारपण असलेल्या व्यक्ती, शारीरिकदृष्ट्या आजारी, विशेषतः हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्ती अतिसंवेदनशील आहेत. कोणालाही उष्णतेचा ताण आणि उष्णतेशी सबंधित आजाराचा त्रास होऊ शकतो, तरीही या लोकांना इतरांपेक्षा जास्त धोका असतो आणि त्यांच्याकडे अतिरिक्त लक्ष द्यावे. एकटे राहणाऱ्या वृद्ध किंवा आजारी व्यक्तींवर देखरेख ठेवली पाहिजे. त्यांच्या आरोग्याचे दररोज निरीक्षण केले पाहिजे.

नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत महानगरपालिकेची सर्व रुग्णालये व नागरी आरोग्य केंद्र या स्तरांवर केंद्र व राज्य शासनाच्या वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या सूचना देण्यात येत आहेत व त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. तरी नवी मुंबई नागरिकांनी खबरदारीचा भाग म्हणून “काय करावे” व “काय करू नये” या संदर्भातील सूचनांचे पालन करावे आणि उष्माघात संदर्भात लक्षणे आढळून आल्यास त्वरित नमुंमपाच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व रुग्णालयातून उपचार घ्यावेत, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मध्य रेल्वेतर्फे २७८ अनारक्षित गाड्यांसह ८५४ उन्हाळी विशेष गाड्या
Next Article अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजले, 30 जूनपासून पावसाळी अधिवेशन

Latest News

माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी शिवसेनेची ताकद उभी करावी; उद्धव ठाकरेंकडे मागणी
महाराष्ट्र August 2, 2025
कृषी विभागाने शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून लोकाभिमुख काम करावे – कृषीमंत्री
महाराष्ट्र August 2, 2025
होटगी रोड विमानतळावर पूर्वीपासूनच नाईट लँडिंग
सोलापूर August 2, 2025
सोलापूर – ई-पीक पाहणी केली तरच मदत मिळणार
सोलापूर August 2, 2025
कांद्याला निर्यात अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी
महाराष्ट्र August 2, 2025
कर्नाटक : माजी खासदार प्रज्वल रेवन्ना यांना जन्मठेप
Top News August 2, 2025
विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांचे विचार अंगीकारत ध्येय गाठावे – भूषण गवई
महाराष्ट्र August 2, 2025
शेतकरी क्रांती संघटनेचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत विलय
देश - विदेश August 2, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?