Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: युजवेंद्र चहलपासून घटस्फोट घेतल्यानंतर धनश्री वर्माची सिनेसृष्टीत एन्ट्री
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot News

युजवेंद्र चहलपासून घटस्फोट घेतल्यानंतर धनश्री वर्माची सिनेसृष्टीत एन्ट्री

admin
Last updated: 2025/04/18 at 6:53 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

मुंबई , 18 एप्रिल (हिं.स.)। भारताचा क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचं नातं अखेर गेल्या महिन्यात २० मार्च रोजी संपुष्टात आले.घटस्फोट घेतल्यानंतर धनश्री तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करताना दिसत आहे. धनश्री उत्तम नृत्यांगणा आहे आणि तिच्या नृत्याचे अनेक व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. नृत्यांगणा असण्याबरोबरच धनश्री एक अभिनेत्री आहे आणि लवकरच ती सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. याबद्दल धनश्रीने स्वत:च माहिती दिली आहे.

धनश्रीने स्वतः तिचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर करत पहिला चित्रपट येणार असल्याचे म्हटलं आहे. धनश्री बऱ्याच दिवसांपासून हैदराबादमध्ये तिच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण करत होती. याच चित्रीकरणाचे आणि टीमचे काही खास क्षण तिने पोस्टद्वारे शेअर केले आहेत. ती ज्येष्ठ चित्रपट निर्माते दिल राजू यांच्या प्रॉडक्शनच्या आगामी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर एन्ट्री करणार आहे. दरम्यान, धनश्रीच्या या पोस्टमधून तिच्या चित्रपटाचे किंवा भूनिकेचे नाव जाहीर झालेलं नाही. त्यामुळे अनेकांनी तिच्या भूमिकेविषयी आणि चित्रपटाच्या नावाविषयीजी उत्सुकता व्यक्त केली आहे. चित्रपटाच्या आधी धनश्रीचं एक गाणंही प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. ‘देखा जी देखा मैंने’ असं या गाण्याचं नाव असून घटस्फोटाच्या सुनावणी दिवशीच हे गाणं प्रदर्शित झालं होतं.

धनश्री व चहल यांच्या नात्याबद्दल बोलायचं झालं तर, मोठ्या थाटामाटात डिसेंबर २०२० मध्ये दोघं लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर दोघं सतत एकत्र दिसायचे. त्याचबरोबर सोशल मीडियावर एकत्र रील व्हिडीओ शेअर करायचे. पण २०२३ मध्ये धनश्री-चहलच्या नात्यात तेढ निर्माण होतं असल्याचं समोर आलं. दोघं विभक्त होण्याच्या चर्चेला उधाण आलं होतं. आणि अखेर २० मार्च २०२५ रोजी त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article दीड कोटी प्राथमिक सदस्यांची नोंदणी करून महाराष्ट्र भाजपाने रचला इतिहास
Next Article छत्तीसगडच्या सुकमामध्ये 22 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

Latest News

इराणची धमकी, ट्रम्प यांचा थेट आणि कठोर इशारा
देश - विदेश June 15, 2025
पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; २५ ते ३० पर्यटक बुडाल्याची भीती
महाराष्ट्र June 15, 2025
इंद्रायणी घटना : दोघांचा मृत्यू तर ६ जणांना वाचवण्यात यश – मुख्यमंत्री
महाराष्ट्र June 15, 2025
मोहोळ तालुक्‍यातील लांबोटी येथे पोलिसांच्या चकमकीत सराईत गुन्हेगार ठार
सोलापूर June 15, 2025
सोलापूर – गाडीतून पडून भाजीपाला विक्रेत्याचा दुदैवी मृत्यू
सोलापूर June 15, 2025
आषाढीसाठी सोलापुरातून 250 जादा एसट्यांचे नियोजन
महाराष्ट्र June 15, 2025
शेतकऱ्यांच्या जीवनात अर्थिक संपन्नता आणण्यासाठी सहकार चळवळ टिकली पाहिजे – सुळे
महाराष्ट्र June 15, 2025
सोलापूर विद्यापीठाचा भाभा अणुसंशोधन केंद्राशी करार
सोलापूर June 15, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?