प्रतिनिधी
सोलापूर : लक्षवेधी ठरलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदाची निवडणूक आज होत आहे. कोण विजयाचा गुलाल अंगावर घेणार, येथील सत्तेची तराजू कोणत्या गटाकडे पर्यायाने पॅनेलकडे जाणार, याचा कौल आज बाजार समितीच्या एकूण 5 हजार 421 मतदारराजांकडून मतपेटीत बंद होणार आहे. विविध मुद्यांवर खास करुन ग्रामपंचायत आणि सोसायटी मतदार संघात अनेक ठिकाणी घासून आणि ठासून होत असलेल्या या निवडणुकीत आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार दिलीप माने, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, भाजप नेते शहाजी पवार तसेच दुसर्या पॅनलचे प्रमुख आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब शेळके या पॅनेल प्रमुखांसह निवडणुकीच्या आखाड्यामधील उमेदवारांची परीक्षा आज निवडणुकीच्या निमित्ताने होणार आहे.
विशेष म्हणजे शेतकर्यांच्या कल्याणाचे केंद्र असलेल्या बाजार समितीच्या सत्तेची तराजू कोणाच्या ताब्यात द्यायची, याचा निर्णय आज मतदानातून सभासद मतदार घेणार आहेत. बाजार समितीसाठी ठराविक 5 हजार 421 इतकं ठराविक मतदान असल्यामुळे ते आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी बहुतांश ठिकाणी ‘लक्ष्मी’दर्शनाचा फंडा वापरण्यात आल्याची मोठी चर्चा आहे.
मित्रत्वाचं ‘सेटिंग’ मालकांना मिळवून देणार का सिंहासन?
जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मित्र तथा निकटवर्तीर जयकुमार गोरे आणि माजी आमदार दिलीप माने यांच्यामध्ये चांगला दोस्ताना आहे. या दोस्त्यामधूनच गोरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कानावर गोष्ट घालून आमदा कल्याणशेट्टी आणि दिलीप मानेंचा सहयोग घडवून आणला. सुरेश हसापुरेंना बरोबर घ्यायाला लावलं आणि कल्याणशेट्टी, माने आणि हसापुरेंचे पॅनेल गोरेंने जन्माला घातले. दिलीप माने या आपल्या खास मित्रासाठी बाजार समितीमधील भाजपच्या एंट्रीसाठी ना.गोरे यांनी हे सेंटींग लावले, हेच सेटींग माने यांना बाजार समितीमधील सिंहासन मिळवून देईल का? तसेच येथे भाजपची एंट्री होईल का, याचा फैसलादेखील आजच मतदारांकडून होतोय.
साठे, म्हेत्रे, शेळकेंची दिसेल का ताकद?
आमदार देशमुखशाही पॅनेलला बळीराम साठे, सिद्धाराम म्हेत्रे, बाळासाहेब शेळके यांनी पाठिंबा देऊन आपल्या नेतृत्वाची ताकद लावली आहे. देशमुखांच्या पॅनेलसाठी त्यांची किती ताकद लागली, हे निवडणूक निकालातून सोमवारी स्पष्ट होणार आहे.
काही हायलाईटस्…
– कल्याणशेट्टी, माने, हसापुरे, सुभाष देशमुख
आदींच्या प्रतिष्ठेची अन् अस्तित्वाची परीक्षा
– या निवडणुकीत सुभाष देशमुखांचे दक्षिणमधील दिसणार वजन आणि वलय
– भाजपच्याच दोन आमदारांमध्ये होत असलेल्या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष
– कल्याणशेट्टींनी पॅनेज जिंकून आणल्यास मुख्यमंत्री देवाभाऊंकडे त्यांचे वाढणार वजन
– सिद्धाराम म्हेत्रे, बळीराम साठे, बाळासाहेब शेळके यांचेही या निवडणुकीतून दिसणार नेतृत्वाचे वजन
– घडविलेल्या ‘लक्ष्मी’दर्शनावर प्रामाणिक राहून मतदार करणार का मतदान याकडे पॅनेल प्रमुखांसह उमेदवारांचे लक्ष
– सुरुवातीला बोललेल्या खासदार प्रणिती शिंदे आणि ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेंनी बाजार समितीची निवडणूक सोडली वार्यावर
– सत्तेच्या पदांपासून दूर राहिलेल्या दिलीप मानेंना सत्तेचे सिंहासन मिळण्याचा आला योगायोग
–

 
			 
                                 
                              
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		