Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: फेलोशिपच्या प्रतिक्षेतील 480 विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top News

फेलोशिपच्या प्रतिक्षेतील 480 विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

admin
Last updated: 2025/05/03 at 6:29 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

अमरावती, 3 मे (हिं.स.)छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे अर्थात सारथी अंतर्गत पीएचडी करणाऱ्या संशोधकांना अधिछात्रवृत्ती देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला असून वर्ष २०२५-२०२५ च्या बजेट मध्ये ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. या निर्णयामुळे मागील तीन वर्षांपासून फेलोशिप च्या प्रतीक्षेत असलेल्या जवळपास ४८० विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून त्यांना संशोधन कार्य करण्यासाठी अधिछात्रवृत्ती लवकरच बहाल करण्यात येणार आहे. या बद्दल आ.सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री ना. अजितदादा पवार तसेच महायुती सरकारचे आभार मानीत अभिनंदन केले आहे.

सारथी संस्थे अंतर्गत पीएचडी अधिछात्रवृत्तीकरिता वर्ष २०२२-२३ मध्ये ९६९ विद्यार्थ्यांनी अर्ज केला असता या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून फेलोशिप देण्याचा निर्णय महायुती शासनाच्या वतीने घेण्यात आला. नंतर ९६९ विद्यार्थ्यांपैकी ८१० विद्यार्थ्यांनी सहामाही प्रगती अहवाल सादर करीत संशोधन कार्य सुरु केले. मात्र केवळ ३२४ विद्यार्थ्यांची अधिछात्रवृत्ती जमा करण्यात आली. तर ४८० विद्यार्थ्यांना अजूनही फेलोशिप न मिळाल्याने त्यांचे संशोधनकार्य पूर्ण होण्यास अडचणी निर्माण झाल्या. या संदर्भात सारथी अंतर्गत संशोधककार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आ. सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी निवेदन डेनऊन न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती.

त्याअनुषंगाने आमदार महोदयांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांना पत्र देऊन छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे अर्थात सारथी अंतर्गत पीएचडी करणाऱ्या संशोधकांना अधिछात्रवृत्ती देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यावर सारथी साठी वर्ष २०२५-२०२५ च्या बजेट मध्ये ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच संशोधनकार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्वरितअधिछात्रवृत्ती देण्यासंदर्भात सुद्धा उपमुख्यमंत्री महोदयांनी सारथी पुणे प्रशासनाला निर्देशित केले आहे. त्यामुळे मागील ३ वर्षांपासून फेलोशिप मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या जवळपास ४८० विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या बद्दल या बद्दल आ.सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री ना. अजितदादा पवार तसेच महायुती सरकारचे आभार मानीत अभिनंदन केले आहे. —————

You Might Also Like

सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीत वाढ

रेल्वेत 2030 पर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट

राज्यात मान्सूनचं आगमन; पुढील ६-७ दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा

छत्तीसगड : बसवा राजूसह 30 नक्षलवादी ठार

भुजबळ आणि माझ्यात मतभेद नाहीत – कोकाटे

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
Next Article भारत-पाकिस्तान पोस्टल आणि पार्सल सेवा बंद

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?