अलिबाग, 3 जून (हिं.स.)। जादुटोणा करण्याच्या निमित्ताने तिघांची ४० लाखांची फसवणूक केल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी चौघांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अडल्या नडलेल्या लोकांना हेरून त्यांचा विश्वास संपादन करून त्यांची फसवणूक करण्याचा उद्योग महेश यशवंत मोरे यांनी अलिबाग तालुक्यातील ठिकरूळ नाक्याजवळ सुरू केला होता. त्याची पत्नी अपुर्वा मोरे, दोन मानस पुत्र मिहीर मांजरेकर उर्फ मिहीर मोरे आणि सागर कुंड त्यांना यात सहकार्य करत होते.
पनवेल येथे राहणाऱ्या बांधकाम व्यवसायिक असलेल्या फिर्यादीचे अलिबाग तालुक्यात ठिकठिकाणी कामे सुरू होती. या कामांचे पैसे अडकून पडली पडले होते. हे पैसे लवकर मिळवून देण्यासाठी विविध देवदेवस्की आणि जादूटोणा करण्याचा सल्ला दिला. त्यांचा विश्वास संपादन करून वेळोवेळी ३८ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली. तर दुसऱ्या एका सधन कुटूंबाला त्यांच्या कौटुंबिक वाद मिटावे आणि शांतता व स्थैर्य लाभावे यासाठी मंतरलेले दगड घराभोवती पुरून उपाययोजना करण्यास सांगितले, यासाठी २ लाख २५ हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली.
आणखीन एकाची व्यक्तीची १ लाख २९ हजारांना फसवणूक केल्याची बाब समोर आली.
महत्वाची बाब म्हणजे या कुटूंबांचा विश्वास संपादन करून एक जेसीबी आणि एक थार गाडीही या मांत्रिकांने स्वतःकडे मागून घेतल्याची बाब समोर आली आहे.
—————