अमरावती, 6 जून (हिं.स.) आगामी महापालिका निवडणुकीत युवा स्वाभिमानीचे इच्छुक उमेदवारांना . भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवाबी लागण्याची शक्यता आहे. आमदार रवी राणा यांनी स्वतः त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना असे संकेत दिले आहेत. त्यानुसार, युवा स्वाभिमानीचे, काहीनिवडकइच्छुक कामालासुद्धा लागले आहेत. उल्लेखनीय म्हणजे अलिकडेच युवास्वाभिमानी पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा एक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात महानगर पालिका निवडणूक लढवण्यास इच्छुकांनीं तिकिटांची मागणी केली होती. यावेळी आमदार रवी राणा म्हणाले की, युवा स्वाभिमानी पक्ष भाजपसोबत युती करून आगामी महानगरपालिका निवडणूक लढवेल.
अशा स्थितीत, जर भाजपला जास्त जागा मिळाल्या, तर स्वाभिमानासाठी इच्छुक असलेल्या काही इच्छुकांना भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवावी लागण्याची शक्यता आहे. आमदार रवी राणा यांच्याकडून मिळालेल्या संकेतांच्या इच्छुकांनीही आधारे अशा राणा पद्धतीने महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.आमदार रवी राणा म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिदे यांच्या उमेदवारांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्याचप्रमाणे महानगर पालिकेतही गरज पडल्यास स्वाभिमानीच्या इच्छुकांना भाजपच्या तिकिटावर महानग रपालिका निवडणुकीत उभे केले जाईल. यासाठी आमदार रवी राणा यांनीही इच्छुकांना तयार राहण्यास सांगितले आहे.
मात्र रवि राणांची ही रंणनिती भाजपचे स्थानिक नेतृत्व स्वीकारते की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार अहे. कारण भाजपने अद्याप आपले पत्ते उघड केलेले नाहीत. परंतु भाजप शहराध्यक्ष आणि ग्रामीण अध्यक्षपदांच्या निवडीमध्ये माजी खासदार नवनीत यांनी ज्या पद्धतीने पुढाकार होता, ते पाहता पुढची रणनिती फारशी कठीण राहणार नाही. उल्लेखनीय असे की, आमदार रवी राणा यांनी युवा स्वाभिमान पक्ष भाजपचा धाकटा भाऊ म्हणून आगामी महानगरपालिका निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती. या महायुतीमध्ये भाजपची भूमिका मोठ्या भावासारखी असेल. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) सोबत युती करण्यासही नकार दिला आहे. —————