Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आंबेडकर भवन विस्तारीकरणासाठी उपमुख्यमंत्र्यांची आंबेडकरी चळवळीतील नेत्यांशी सकारात्मक चर्चा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

आंबेडकर भवन विस्तारीकरणासाठी उपमुख्यमंत्र्यांची आंबेडकरी चळवळीतील नेत्यांशी सकारात्मक चर्चा

admin
Last updated: 2025/06/10 at 7:38 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

पुणे, 10 जून, (हिं.स.)। मंगळवार पेठ येथील ससून हॉस्पिटल समोरील जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या विस्तार करावा, त्या ठिकाणी राष्ट्रीय दर्जाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक निर्माण करावे अशी मागणी घेऊन आंबेडकरी चळवळीतील सर्व पक्षीय नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची समक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले. सदर निवेदनाच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेमध्ये दोन्ही मुख्यमंत्र्यांनी सदर स्मारकाच्या जागेबाबत आपण सकारात्मक असून शासनाच्या वतीने शक्य तितक्या लवकर याबाबत निर्णय घेतला जाईल असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले.

मुंबई येथे उपमुख्यमंत्री यांना भेटलेल्या शिष्टमंडळामध्ये परशुराम वाडेकर, बाळासाहेब जानराव, शैलेंद्र चव्हाण, राहुल डंबाळे, संजय सोनवणे यांचा समावेश होता.

दरम्यान सदर अनुषंगाने आंबेडकरी नेत्यांच्या शिष्टमंडळाने यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावेळी फडणवीस यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करण्यात येऊन त्यांना संपूर्ण विषय सांगितला होता त्यावेळी त्यांनी बाबासाहेबांच्या स्मारकासाठी आपण सकारात्मक आहोत, मात्र काही निर्णय यापूर्वी झाले असल्यामुळे तांत्रिक अडचण दूर झाल्याशिवाय यात निर्णय घेता येणार नाही असे त्यांनी कळवले होते. त्या अनुषंगाने दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

—————

You Might Also Like

शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बच्चू कडूंच्या समर्थनार्थ जलसमाधी आंदोलन
Next Article बंगळुरु चेंगराचेंगरी प्रकरण :  आरसीबीला लवकरच मिळणार नवा मालक ?

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?