Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘त्या’ पीडितेच्या मदतीसाठी रामदास आठवले पुढे का आले नाहीत? कुठे गेले होते ?
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुड

‘त्या’ पीडितेच्या मदतीसाठी रामदास आठवले पुढे का आले नाहीत? कुठे गेले होते ?

Surajya Digital
Last updated: 2020/09/29 at 10:01 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. त्यामुळे खळबळ माजली आहे. देशभरात घडणाऱ्या विविध घडामोडींवर ती रोखठोकपणे आपली मतं मांडते.

स्वरा भास्कर हिने आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर निशाणा साधला आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप करणाऱ्या अभिनेत्री पायल घोषला रामदास आठवले यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच तिला ‘वाय श्रेणी’तील सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. त्यांच्या या भूमिकेवर स्वराने संताप व्यक्त केला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये १९ वर्षीय तरुणीवर सवर्ण समाजातील चौघांनी सामूहिक बलात्कार केला होता. दोन आठवड्यापूर्वी ही घटना घडली होती. आज उपचारांदरम्यान त्या तरुणीचा मृत्यू झाला. “या पीडितेच्या मदतीसाठी रामदास आठवले पुढे का आले नाहीत? पायल पेक्षा या पीडितेच्या कुटुंबीयांना त्यांच्या मदतीची गरज अधिक होती.” अशा आशयाचं ट्विट करुन स्वराने रामदास आठवले यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

“अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केलं असून मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली आहे. कृपया या व्यक्तीविरोधात काही तरी कारवाई करा, ज्यामुळे या माणसाचं खरं रुप समोर येईल. मला माहित आहे यामुळे मला धोका असून माझ्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कृपया माझी मदत करा”, असं ट्विट पायल घोषने केलं. यामुळेच आज रामदास आठवले यांच्यासह अभिनेत्री पायल घोष राज्यपालांच्या भेटीस गेले होते.

You Might Also Like

तमिळ अभिनेते माधन बॉब यांचे निधन

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

TAGGED: #पायलघोष #राज्यपाल #रामदासआठवले #स्वराभास्कर #पीडित #कुठेगेले
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राज्यपालांना वेळ नाही, मात्र पवारांसमोर मांडल्या ‘त्या’ शेतक-यांनी अडचणी
Next Article तिचे कंबरेचे हाडही मोडले; योगी सरकारची महाराष्ट्राकडून कानउघाडणी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?