मुंबई : गोव्यातील धरणावर आक्षेपार्ह चित्रीकरण केल्याने अभिनेत्री, मॉडेल पूनम पांडेला गोवा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. थोड्याच वेळात तिला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तिच्या वादग्रस्त कृत्यामुळे पूनम सतत विवादात अडकत आहे.
व्हिडीओच्या चित्रिकरणादरम्यान पूनम पांडेजवळ उभ्या असलेल्या दोन पोलिस कर्मचार्यांनाही निलंबित करण्यात आले आहे. कॅनकोना पोलिसांनी पूनमला अगौदा येथील रिसॉर्टमधून अटक केली आहे. या प्रकरणात अश्लील फोटो शूट करणार्या अज्ञात व्यक्तीवरही गुन्हा दाखल आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गोव्यातील चापोली धरणावर आक्षेपार्ह व्हिडीओचे चित्रीकरण केल्याने पूनम पांडे विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. गोवा फॉरवर्ड पक्षाच्या महिला शाखेने पूनम पांडे विरोधात गोव्यातील पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. या एफआयआरमुळे पूनम पांडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
लग्नानंतर गोव्यावरून परतलेली पूनम नुकतीच पुन्हा गोव्यात परतली होती. पूनम पांडेचा सदर व्हिडीओ चित्रित करणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधातही तक्रार दाखल करण्यात आली आहे. दक्षिण गोव्याचे एसपी पंकज कुमार सिंह यांनी एएनआयला माहिती देताना सांगितले की, जलसंपदा विभागाचे सहायक अभियंता यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे आयपीसीच्या कलम 294 अन्वये पूनम पांडेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.