नवी दिल्ली : दिल्लीत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी मोठी घोषणा केली आहे. कोरोनावर लस येत नाही, तोपर्यंत दिल्लीतील शाळा सुरू होणार नाहीत, असं दिल्ली सरकारने जाहीर केलंय.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दिल्लीतील बहुतेक पालक शाळा सुरू करण्याच्या विरोधात असल्याचं सिसोदिया यांनी ३० ऑक्टोबर रोजी म्हटलं होतं. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत दिल्लीतील शाळा बंदच राहतील, अशी घोषणा सिसोदिया यांनी केली होती. आता सिसोदिया यांनी थेट जोवर लस येत नाही तोपर्यंत शाळा सुरू होणार नाहीत, अशी भूमिका घेतली आहे.
”आम्ही सतत पालकांच्या संपर्कात आहोत आणि त्यांचं मत जाणून घेत आहोत. शाळा सुरू करण्यासाठी सध्याचं वातावरण योग नसल्यानं सर्वजण साशंक आहेत. ज्या ठिकाणी शाळा सुरू करण्यात आल्या तिथं विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे दिल्लीतील शाळा पुढील आदेशापर्यंत बंदच राहतील”
मनीष सिसोदिया – उपमुख्यमंत्री, दिल्ली