Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: नवर्‍याच्या लफड्यावरुन गर्भवती बायकोला बदडले, काय भानगड ? पूढे काय झालं?
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

नवर्‍याच्या लफड्यावरुन गर्भवती बायकोला बदडले, काय भानगड ? पूढे काय झालं?

admin
Last updated: 2025/04/09 at 2:11 PM
admin
Share
3 Min Read
SHARE

खास प्रतिनिधी : कारखान्यातील कामाच्या ठिकाणचे नवर्‍याचे एका मुलीसोबत असलेले लफडे बिचार्‍या बायकोला चांगलेच भोवले. या प्रकरणात संबधित मुलीच्या नातेवाईकांमधील संशयित चार महिलांनी सात महिन्याच्या गर्भवती महिलेवर हल्ला करीत अमानुषपणे मारहाण करण्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोलापुरातील तुळजाई नगर भागात ही घटनी घडली. येथील अक्कलकोट रोड एमआयडीसी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. येथे घडलेल्या मानवतेला काळीमा फासणार्‍या या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

विशेषत्वे, पोलीसांच्या प्राथमिक तपासात सकृतदर्शनी मुलीसोबतच्या ऐनितीक संबंधावरुनच या महिलेस घरी येऊन मारहाण केल्याचे स्पष्ट होत आहे. तशी माहिती अक्कलकोट रोड एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या सुत्रांनी दिली आहे. नेमकं काय घडलं?
सोलापुरात एका गर्भवती महिलेला निर्दयीपणे मारहाण करण्यात आली. शिल्पा कृष्णा मिस्किन (वय 24 रा. तुळजाई नगर) असे मारहाण झालेल्या गर्भवती महिलेचे नाव आहे. तिला पोटावर आणि पाठीवर लाथाबुक्यांनी गंभीर मारहाण करण्यात आली आहे, असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे.
या घटनेबाबत शिल्पा यांची सासू प्रभावती मिस्कीन यांनी सांगितले की, माझा मुलगा एका कारखान्यात कामाला आहे. त्याच्या कामाच्या ठिकाणी असलेली एक मुलगी सतत त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होती. काही दिवसांपूर्वी त्या दोघ एकमेकांशी बोलत असताना मुलीच्या कुटुंबियांनी पाहिले. त्यांच्या कुटुंबियांना याच गोष्टीचा राग आला. त्या मुलीच्या नातेवाईकांनी माझ्या घरी येऊन माझा मुलगा आणि सूनेला शिवीगाळ केली. त्यानंतर तिला लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. गर्भवती असूनही तिच्या पोटावर आणि पाठीवर गंभीर इजा होईल अशा पद्धतीने मारहाण करण्यात आली. असे प्रभावती मिस्कीन म्हणाल्या.

सीसीटीव्ही फुटेजवरुन येईल मारहाणीचे सत्य समोर
या मारहाण प्रकरणी प्रभावती मिस्कीन यांनी सांगितले की, आमची काही चूक नसताना संबंधितांनी घरी येऊन मारहाण केली. इतकेच नव्हे तर, आम्हाला मारहाण करून पोलीस स्टेशनमध्ये आमच्या नावाची तक्रार देण्याचा प्रयत्न केला. आमच्या घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरा आहे. पोलिसांनी आणि माध्यमांनी याची पडताळणी करावी, अशी विनंती प्रभावती मिस्कीन यांनी केली आहे.

संशियांताना लवकरच होईल अटक
या मारहाणीत जखमी झालेल्या शिल्पा यांच्यावर सुरुवातीला सोलापूर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. मात्र, आता त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर मारहाण करणार्‍या महिलांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे. या महिलेच्या पतीचे आणि एका मुलीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून तिच्या घरच्यांनी ही मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलीस तपास करीत आहेत.लवकरच आरोपींना अटक होईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article स्कूल बसखाली अनुरागचा चेंदामेंदा, करुन अंत, कुटुंबाचा आर्त टाहो, कोठे घडले ‘हे’?
Next Article चौकशीदरम्यान काय घडलं? ‘त्या’ चिमुरडीला मिळणार का न्याय ? ‘खाकी’ वर्दीमधला बाप जागा झाला का?

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?