Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शेतकऱ्यांना पाठिंबा दिल्याने तापसी-अनुरागवर कारवाई, वाचा कोण – कोण काय म्हणाले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुड

शेतकऱ्यांना पाठिंबा दिल्याने तापसी-अनुरागवर कारवाई, वाचा कोण – कोण काय म्हणाले

Surajya Digital
Last updated: 2021/03/05 at 8:33 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू आणि प्रसिध्द दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यावर आयकर विभागाने कारवाई केली. यानंतर शिवसेनेच्या सामनातून मोदी सरकारवर हल्लाबोल करण्यात आला. ‘तापसी, अनुरागसारखी मोजकीच मंडळी शेतकऱ्यांच्या बाजूने उभी राहिली. त्याची किंमत त्यांना चुकवावी लागत आहे. शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहिल्याने तापसी-अनुरागवर कारवाई करण्यात आली आहे’, असे सामनात म्हटले आहे.

तापसी पन्नू, अनुराग कश्यपवरील कारवाईनंतर शिवसेनेने मोदी सरकारवर निशाना साधला. ‘हिंदी सिनेसृष्टीतले इतर सर्व व्यवहार, उलाढाली स्वच्छ पारदर्शक होत आहेत, अपवाद फक्त अनुराग आणि तापसीचा. कुठेतरी गडबड आहे. पण, तुमच्या त्या बॉलिवूडमध्ये जी कोटीच्या कोटी उड्डाणे रोज होतात, ते काय गंगाजलाच्या प्रवाहातून वर येतात? पण कुठेतरी पाणी मुरत असल्याने सरकारच्या तालावर नाचायचे हेच घडत आहे’, असेही सामनात म्हटले आहे.

चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांची बुधवारी सकाळपासून इनकम टॅक्स विभागाकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीदरम्यान या दोघांशी संबंधीत ऑफिसेस आणि मालमत्तांवर इनकम टॅक्स विभागाकडून छापे टाकण्यात आलेत. मुंबई, पुणे, हैदराबाद आणि दिल्ली या चार शहरांमधील एकूण 28 ठिकाणी हे धाडसत्र सुरु आहे. तापसी पन्नु आणि अनुराग कश्यप हे सिनेमाच्या शूटिंगसाठी पुण्यातील वेस्टीन हॉटेलमधे थांबलेले असताना तिथेच त्यांची चौकशी करण्यात येत आहे. या चौकशीमध्ये या दोघांशी संबंधीत मिडीया प्रोडक्शन कंपनीला सिनेमामुळे बॉक्स ऑफिसवर जितका फायदा झालाय त्यापैकी 300 कोटी रुपयांचा हिशेब देण्यात हे दोघे असमर्थ ठरल्याच इनकम टॅक्स विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटंल आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सीबीडीटीने सांगितलं की, प्रोडक्शन हाऊसच्या शेअर्सच्या देवाण-घेवाणीत झालेल्या फेरफारी संबंधित काही पुरावे हाती लागले आहेत. 350 कोटी रुपयांच्या टॅक्समध्ये गडबड झाल्याची माहिती मिळाली आहे. अभिनेत्री तापसी पन्नूच्या नावावर 5 कोटी रुपयांची कॅश रिसिप्टही मिळाली आहे. याप्रकरणी तपास सुरु आहे.

यापूर्वी अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की, ही छापेमारी फँटम फिल्म्सच्या विरोधात कर चोरीचा तपासाचा एक हिस्सा आहे. त्यांनी सांगितलं की, ही छापेमारी 30 ठिकाणांवर करण्यात आली आहे. दरम्यान, फँटम फिल्म्स प्रोडक्शन हाऊस 2018 नंतर बंद करण्यात आलं होतं. यामध्ये याचे तत्कालीन प्रचारक अनुराग कश्यप , निर्देशक-निर्माता विक्रमादित्य मोटवाने, निर्माता विकास बहल आणि निर्माता-वितरक मधु मंटेना यांचा समावेश होता.


* अनुराग, तापसीवर कारवाई; 300 कोटींची अनियमितता उघड

बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्ददर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या घरी आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात मोठी माहिती समोर आले आहे. या सेलिब्रिटींच्या आर्थिक व्यवहारात 300 कोटींवर अनियमितता आढळून आली. त्यांच्या घर व कार्यालयांवरील आयकर विभागाच्या छाप्याची कारवाई दुसऱ्या दिवशीही सुरु होती. अनुराग कश्यप व तापसीचे मोबाइल व लॅपटॉप जप्त करण्यात आले आहे.

* ‘भाजपने पोलिस, ईडी, सीबीआय, एनसीबीचा वापर केला’

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्याविरोधात आयकर विभागाने आज धाडसत्र सुरू केली. आयकर विभागाच्या पथकांनी अनुराग आणि तापसीच्या मुंबईतील मालमत्तेवर छापे टाकत झाडाझडती सुरू केली. यावरून अभिनेता कमाल रशीद खान म्हणजेच केआरके याने भाजपवर हल्लाबोल केला. ‘भाजपा सरकारने पोलिस, ईडी आयटी डिपार्टमेंट, सीबीआय आणि एनसीबी यांचा वापर केला आहे’ या आशयाचे ट्वीट केले आहे.

* बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये दहशतवादी भरले – कंगना

दरम्यान या कारवाईवर अभिनेत्री कंगना रणौत हिने प्रतिक्रिया देत या कलाकारांची तुलना दहशतवाद्यांशी केली. “मला पहिल्यापासूनच माहित होत ही मंडळी देशविरोधी कृत्य करत आहेत” असा टोला तिनं लगावला. ही मंडळी जेव्हा राष्ट्रविरोधी जाहिराती करुन मजुरांना भडकवण्याचा प्रयत्न करत होती तेव्हाच कळलं होतं काही तरी गडबड आहे. माहिती परत घेतली जाऊ शकते परंतु हे लहान मासे आहेत. बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये दहशतवादी भरले आहेत. ही मंडळी आपल्या पैशांचा वापर करुन भारताचे तुकडे करण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकारनं अशा लोकांना चांगलाच धडा शिकवायला हवा.” अशा आशयाची दोन ट्विट्स करुन कंगनानं अनुराग आणि तापसीवर जोरदार टीका केली.

You Might Also Like

तमिळ अभिनेते माधन बॉब यांचे निधन

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

TAGGED: #Action #Tapasi-Anurag #supporting #farmers #read #whosaidwhat, #शेतकऱ्यांना #पाठिंबा #तापसी-अनुरागवर #कारवाई #वाचा #कोणकायम्हणाले
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मोठी बातमी, दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या तारखात बदल
Next Article पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 महिन्यांनी जाणार परदेश दौऱ्यावर

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?