Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अफगाणिस्तानमध्ये सत्तांतर, आम्हाला झटका बसला, महिलांची चिंता – मलाला
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot News

अफगाणिस्तानमध्ये सत्तांतर, आम्हाला झटका बसला, महिलांची चिंता – मलाला

Surajya Digital
Last updated: 2021/08/16 at 2:06 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

काबूल : अफगाणिस्तानमध्ये पुन्हा तालिबान्यांची सत्ता स्थापन झाल्याने नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसूफजाईने चिंता व्यक्त केली आहे. आम्हाला मोठा झटका बसला आहे, असे ती म्हणाली. ‘अफगाणिस्तानमधील महिला, अल्पसंख्यांक नागरिक, मानवाधिकार कार्यकर्ते यांचा जीव धोक्यात असल्याने परिस्थिती चिंताजनक आहे,’ असे मलालाने म्हटले आहे. दरम्यान तालिबान्यांच्या हल्ल्यात मलाला गंभीर जखमी झाली होती.

अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर पाकिस्तानची नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफझाईचे वक्तव्य समोर आले आहे. ती म्हणाले की अफगाणिस्तानवर तालिबानच्या कब्जामुळे मोठा धक्का बसला आहे. महिला, अल्पसंख्यांक आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या स्थितीबद्दल खूप चिंता वाटत आहे. तालिबानने अफगाणिस्तानच्या मोठ्या भागावर ताबा मिळवल्यानंतर मलालाचे हे पहिले विधान आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मलालाने ट्वीट केले, की “अफगाणिस्तान तालिबान्यांनी ताब्यात घेतले आहे, हे पाहून आम्हा सर्वांना मोठा धक्का बसला आहे. मला तिथल्या महिला, अल्पसंख्यांक आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांची खूप चिंता वाटतेय. जागतिक, प्रादेशिक आणि स्थानिक शक्तींनी त्वरित युद्धबंदी करुन मानवतावादी मदत प्रदान करणे, निर्वासित आणि नागरिकांचे संरक्षण करणे आवश्यक आहे.

मलाला युसुफझाई यापूर्वीच तालिबानच्या निशाण्यावर राहिली आहे. यामुळेच मलालाला पाकिस्तान सोडावे लागले. खरं तर, केवळ मलालाच नाही, जगभरातील अनेक लोकांना अफगाणिस्तानमधील परिस्थिती पाहून मनापासून धक्का बसला आहे. अफगाणिस्तानमध्ये अनेक प्रकल्प उभारणाऱ्या भारतासह सर्व देशांचे भविष्य आता धोक्यात आले आहे.

येत्या काळात अफगाणिस्तानमध्ये कोणत्या प्रकारची सत्ता समीकरणे असतील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु, अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी राजीनामा देऊ शकतात असा दावा अहवालांमध्ये केला जात आहे. पण एक गोष्ट स्पष्ट आहे की तालिबानशी लढण्यासाठी अफगाण सरकारकडे खूप मर्यादित पर्याय शिल्लक आहेत. काबूलवरील तालिबानची पकड इतक्या लवकर बळकट होणार नाही अशी अपेक्षा होती, पण त्यांनी ज्या प्रकारे काबूल पाडला आहे, त्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे.

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #Independence #Afghanistan #shocked #women's #concern #Malala, #अफगाणिस्तान #सत्तांतर #झटका #महिलांची #चिंता #मलाला
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आज साजरं केलं जातंय पारशी नववर्ष, भारतात जवळपास 60 हजार पारशी लोकं
Next Article ‘राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीयवाद वाढला’, पवारांकडून राज ठाकरेंना उत्तर; वाचा मराठा आरक्षणावरही काय म्हणाले ?

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?