पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज शुक्रवारी शौर्यदिनानिमित्त जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी कोरेगाव-भीमा येथे पोहोचले. येथे त्यांनी कोरेगाव-भीमा युद्धाच्या 202 व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांनी अभिवादन केलं
“सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा, यंदाच हे वर्ष सर्वांसाठी सुख समृद्धी आणि भरभराटीचं जावं. गेलं वर्ष कोरोनाचं संकट, त्यामध्ये आलेल्या अडचणी, जगावर देशभरावर अजूनही ते संकट कायम आहे. पण, त्यातून न डगमगता महाविकासआघाडी सरकारने त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. आज 2021 सुरु झालं दरवर्षीप्रमाणे कोरेगाव-भीमाच्या लढाईत जे शूरवीर शहीद झाले, त्या सर्वांना अभिवादन करण्यासाठी मी स्वत:, माझ्यासोबत गृहमंत्री अनिल देशमुख ऊर्जामंत्री नितीत राऊत यांच्यासह अनेक कार्यकर्ते इथे अभिवादन करण्यासाठी आलो”, अशी माहिती अजित पवारांनी यावेळी दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
“मधल्या काळात या शौर्यदिनाला गालबोट लागलं. मात्र, महाराष्ट्राच्या जनतेने त्या अफवांवर विश्वास ठेवू नये. जनतेने नेहमी शांततेचं या ठिकाणी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र कधीही चुकीच्या रस्त्याने गेलेला नाही, ही आपली परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी, बाबासाहेब आंबेडकरांनी, शाहू महाराज, महात्मा फुले या सर्वांनी जो आदर्श आपल्यापुढे ठेवला. त्याचाच आदर करत आपण पुढे वाटचाल करत असतो.”
“पोलीस दलाने, प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला. गृहखात्याने नागरिकांना आवाहन केलं होतं की कोरोनाचं संकट असल्यामुळे घरातून जयस्तंभाला अभिवादन करण्याचं आवाहन केलं होतं. त्यामुळे घरातूनच जयस्तंभाला अभिवादन करावे, असं आवाहन करतो. कोरोना काळात सुरक्षितता बाळगणं महत्वाचं आहे”, असे आवाहन अजित पवारांनी केलं.
* जयस्तंभ विकास आराखडा मंजूर
“जयस्तंभ विकास आराखडा मंजूर करा, अशी मागणी समोर आली आहे. मी या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, मागेही मी यावर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. इथे ज्या जागा आहेत त्या खाजगी लोकांच्या जागा आहेत. येणाऱ्या वर्षांतही लोक इथे अभिवादन करण्यासाठी येत असणार आहेत. त्यामुळे सरकार पुढाकार घेवून इथल्या काही जागा मार्जिनसाठी, लोकांना तिथे सुविधा देण्यासाठी, गर्दी होवून काही वेगळे प्रकार घडू नये त्यासाठी व्यवस्था झाली पाहिजे. असं नियोजन आम्ही केलेलं आहे.
स्थानिक ज्यांच्या जमिनी आहेत त्यांना योग्य मोबदला राज्य सरकारकडून दिला जाईल. त्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही. काही जमिनी या ताब्यात घेतल्या जातील. राज्य सरकारकडून आर्थिक बाजू साभांळली जाईल”, अशी ग्वाही मी राज्यातील जनतेला देतो. मागील सरकारने जो निधी मजूर केला होता तो अजून आला नाहीय, मात्र एकमेकांना ढकलून चालणार नाही”, असंही अजित पवार म्हणाले.