Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘आंबट शौकीन’ येत आहेत १३ जूनला
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot News

‘आंबट शौकीन’ येत आहेत १३ जूनला

admin
Last updated: 2025/04/08 at 1:15 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 8 एप्रिल (हिं.स.)।

आजवर मराठी चित्रपटांमध्ये विविध विषय हे हाताळले गेले आहेत. आता लवकरच तीन मित्रांची धमाल गोष्ट असलेला ‘आंबट शौकीन’ हा चित्रपट येत्या १३ जूनला प्रदर्शित होणार आहे. नुकतेच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाचं मोशन पोस्टर लाँच करण्यात आलं आहे.

बिग ब्रेन प्रॉडक्शन्स, एसएस अँड केएल ब्रदर्स प्रॉडक्शन्स, लॅब्रोस एंटरटेन्मेंट प्रस्तुत “आंबट शौकीन” चित्रपटाचं दिग्दर्शन निखिल वैरागर यांनी केले आहे. निलेश राठी, प्रफुल्ल काकाणी, रंजना मोहित लखोटिया, मोहित लखोटिया, अनघ भुतडा हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. अभिनेत्री पूजा सावंत, प्रार्थना बेहरे, भाऊ कदम, पार्थ भालेराव, अभिजीत खांडकेकर, गौतमी पाटील, मोनालिसा बागल, अमेय वाघ, अक्षय टंकसाळे, निखिल वैरागर, किरण गायकवाड, चिन्मय संत, राहुल मगदूम, श्रीकांत यादव, आशय कुलकर्णी, शुभंकर एकबोटे, देवेंद्र गाडकवाड, रमेश परदेशी अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात आहे. साई पियुष यांनी संगीत दिग्दर्शन, संकेत धोटकर यांनी ध्वनी आरेखन तर मधुराम सोळंकी यांनी छायांकन केलं आहे.

चित्रपटाच्या नावावरून कथानकाचा अंदाज बांधता येत असला तरी अनेक घडामोडींतून चित्रपटाची मनोरंजक कथा उलगडत जाते. तीन मित्रांच्या भोवती चित्रपटाची रंजक गोष्ट गुंफण्यात आली आहे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने पहावी अशी प्रत्येक पिढीची रंजक गोष्ट यातून आपल्याला अनुभवता येणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील उत्तम कलाकारांची फौज आणि धमाल रंजक कथानक यामुळे हा चित्रपट पुरेपूर मनोरंजन करणारा ठरेल यात शंका नाही. त्याशिवाय उत्तम गाण्यांचीही जोड या चित्रपटाला आहे. त्यामुळे आता “आंबट शौकीन” चित्रपट पाहण्यासाठी थोडाच काळ वाट पहावी लागणार आहे.

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article उष्णतेच्या धोक्यापासून स्वत:ला आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवा
Next Article गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून योजनांचा लाभ द्यावा – ॲड. निलेश हेलोंडे पाटील

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?