Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: झपाटलेला चित्रपटात ‘बाबा चमत्कार’ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे निधन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुड

झपाटलेला चित्रपटात ‘बाबा चमत्कार’ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे निधन

Surajya Digital
Last updated: 2021/02/04 at 9:28 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

पुणे :  झपाटलेला चित्रपटात ‘बाबा चमत्कार’ ही भूमिका साकारणारे अभिनेते राघवेंद्र कडकोळ ( वय 83) यांचे आज निधन झाले आहे. राघवेंद्र यांनी मराठी चित्रपट, नाटक आणि मालिकांमध्ये काम केले होते. त्यांचे ‘ब्लॅक अँड व्हाईट’, ‘गौरी’, ‘सखी’, ‘कुठे शोधू मी तिला’ हे मराठी चित्रपट विशेष गाजले. बालगंधर्व परिवारतर्फे राघवेंद्र यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. बाबा चमत्कारमुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली होती.

‘ओम भगभूगे भगनी भागोदरी ओम फट् स्वाहा’… झपाटलेला फिल्मध्ये तात्या विंचूला असा विचित्र मृत्यूंजय मंत्र देणारा बाबा चमत्कारनं जगाचा निरोप घेतला आहे. ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

राघवेंद्र कडकोळ यांनी तीन दशकं मराठी नाटक-चित्रपट, मालिकांतून दमदार अभिनय केला. राघवेंद्र यांनी कृष्णधवल चित्रपटांपासून अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. कर्नाटकी हेल काढत बोलणाऱ्या भूमिकाच त्यांच्या वाट्याला अधिक आल्या. ‘झपाटलेला’ चित्रपटातील त्यांची बाबा चमत्कार ही भूमिका गाजली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

‘पळवापळवी’, ‘वाजवू का’ चित्रपटात दादा कोंडके यांच्यासोबत कडकोळ यांची केमिस्ट्री भन्नाट जमली होती. ‘पंढरीची वारी’ चित्रपटातील राजा गोसावी, कडकोळ अण्णांची जुगलबंदी अविस्मरणीय होती. त्यांनी ‘ब्लक अँड व्हाईट’, ‘गौरी’, ‘सखी’, ‘कुठे शोधू मी तिला’ या मराठी चित्रपटांमध्ये काम केले. त्यानंतर ‘छोडो कल की बात’ या हिंदी चित्रपटात देखील त्यांनी भूमिका साकारली होती.

करायला गेलो एक हे पहिलं व्यावसायिक नाटक त्यांनी साकारलं. नाटकांच्या दौऱ्यांमुळे त्यांना नोकरी सोडावी लागली. अश्रूंची झाली फुले नाटकात त्यांनी धर्माप्पा ही भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका त्यावेळी विशेष गाजली होती. धोंडी, देवदासी, हसुया पण कायद्याच्या कचाट्यात, रायगडाला जेव्हा जाग येते सारख्या चित्रपट नाटक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.

* राघवेंद्र यांची थोडक्यात माहिती

राघवेंद्र यांनी आपलं शिक्षण सोडून देशसेवा करण्याचा निर्णय घेतला आणि नौदलात भरती होण्यासाठी परीक्षा पास केल्या. भारतीय आयएनएस विभागात एका टीम सोबत त्यांना पाठवण्यात आलं. पण नंतर पुन्हा मेडिकल टेस्ट घेऊन त्यांना घरी पाठवण्यात आलं.

राघवेंद्र यांनी पुन्हा शिक्षणाकडे लक्ष केंद्रीत केलं. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांच्या वडिलांचे निधन झालं. त्यामुळे घरातील आर्थिक जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली.

उदरनिर्वाहासाठी त्यांनी टायपिस्ट म्हणून सरकारी नोकरी मिळवली. नोकरी करत असताना राघवेंद्र यांनी रंगभूमीवर पडद्यामागे कलाकारांना निरोप देणं, चहा देणं, खुर्च्या मांडणं अशी मिळेल ती कामं केली. पण एक कलाकार म्हणून त्यांनी कधीच कुणासमोर काम मिळवण्याची मागणी केली नाही.

त्यांच्यातील कलागुणांमुळे त्यांना बालगंधर्व जीवन पुरस्कार आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेतर्फे ‘नटवर्य केशवराव दाते पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आलं होतं. त्यांनी गोल्ड मेडल नावाचं पुस्तक लिहिलं आहे.

You Might Also Like

तमिळ अभिनेते माधन बॉब यांचे निधन

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

TAGGED: #Babachamtkar #raghavendra #kadkol #dead, #झपाटलेला #चित्रपटात #बाबाचमत्कार #भूमिका #साकारणाऱ्या #अभिनेत्याचे #निधन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कंगनाची ट्वीटरवरील ‘टीवटीवाट’ महागात पडली, वादग्रस्त ट्वीट हटवले
Next Article शेतकरी विधवांनी कंगना रनौतचा जाळला पुतळा, का जाळला ?

Latest News

मोदींना थांबायला सांगण्याचा, बोलायचा मला नैतिक अधिकार नाही : शरद पवार
राजकारण September 18, 2025
निवडणूक आयोग देशभर ‘एसआयआर’ प्रक्रिया राबविणार
देश - विदेश September 18, 2025
सोलापूर – आयटी पार्कसाठी चार जागांचा प्रस्ताव; काम अंतिम टप्प्यात
सोलापूर September 18, 2025
इगतपुरीत अवैध कॉलसेंटरवर छापा, दोघांना अटक, २४ लाखांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र September 18, 2025
मतदान चोरी एका संघटित कटाचा भाग; केवळ काँग्रेस समर्थक मतदार लक्ष्य – राहुल गांधी
महाराष्ट्र September 18, 2025
तालिबानची अफगाणिस्तानात इंटरनेट आणि फायबर-ऑप्टिक सेवेवर बंदी
देश - विदेश September 18, 2025
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट-क अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा रविवारी
महाराष्ट्र September 18, 2025
राहुल गांधींचे आरोप चुकीचे आणि निराधार – निवडणूक आयोग
राजकारण September 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?