Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बजाजपाठोपाठ पार्लेचा टीआरपी घोटाळ्यातील वृत्तवाहिन्यांना दणका
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
अर्थाअर्थHot News

बजाजपाठोपाठ पार्लेचा टीआरपी घोटाळ्यातील वृत्तवाहिन्यांना दणका

Surajya Digital
Last updated: 2020/10/14 at 12:04 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : मागील आठवड्यातच टीआरपी घोटाळ्याचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केल्यानंतर आता जाहिरातदार देखील त्यासंदर्भात मोठा निर्णय घेत आहेत. या वृत्तवाहिन्यांना जाहिराती न देण्याचा निर्णय बजाज ऑटोने घेतल्यानंतर आता पाठोपाठ बिस्किटांचे उत्पादन करणाऱ्या पार्ले कंपनीनेही आपल्या जाहिराती काही वृत्तवाहिन्यांवर न दाखवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

टीआरपी घोटाळा पोलिसांनी उघड केल्यानंतर यावर आम्ही लक्ष ठेवून असल्याचे प्रमुख जाहिरातदार आणि मीडिया एजन्सीने म्हटले आहे.

आम्ही द्वेष पसरवणाऱ्या वृत्तवाहिन्यांना जाहिराती न देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कंपनीचे वरिष्ठ अधिकारी कृष्णराव बुद्ध यांनी दिली. याबाबत ते म्हणाले की, अशी शक्यता आम्ही पडताळत आहोत, ज्यात इतर जाहिरातदार एकत्र येतील आणि वृत्तवाहिन्यांवर जाहिराती देण्याच्या आपल्या खर्चाला आळा घालतील, जेणेकरुन वृत्तवाहिन्यांना स्पष्ट संकेत जाईल की, आपल्या मजकुरात बदल करणे त्यांना गरजेचे आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

आम्हाला आक्रमकता आणि द्वेष वाढवण्यास प्रोत्साहन देणाऱ्या वाहिन्यांवर खर्च करायचा नाही, कारण ते आमचे ग्राहक नाहीत.

सोशल मीडियावर पार्लेच्या या निर्णयाचे खूप कौतुक होत असून देशासाठी हे चांगले काम असल्याचे एका ट्विटर युझरने म्हटले आहे. तर उत्तम निर्णय अशी प्रतिक्रिया आणखी एका युझरने दिली. फारच उत्तम, सन्मान, जास्तीत जास्त कंपन्यांनी या मार्गावर चालायला हवे, असे ट्विट एकाने केले आहे. तर ही फक्त सुरुवात असू शकते, अपेक्षा आहे की अधिकाधिक कंपन्या याचे पालन करतील आणि आपल्याला एक सकारात्मक बदल पाहायला मिळेल, असे ट्विट आणखी एका ट्विटर युझरने केले आहे.

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #पार्ले #बजाज #टीआरपी #घोटाळा #वृत्तवाहिन्या #ट्वीट
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article “तुमच्या दिल्लीतील बापाला ‘बाप’ म्हणायला वारसदार नाही”
Next Article ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना अल्झायमर; मुलगा अभिनेता अजिंक्य देव यांनी दिली माहिती

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?