भंडारा, 28 एप्रिल (हिं.स.)। जप्त केलेल्या वाळूचा साठा घरकुल लाभार्थ्यांना वाटप करून दुचाकीने परत येत असलेल्या तलाठ्यावर काळाने झडप घातली. यात २८ वर्षीय तलाठ्याचा दुचाकी अपघातात अंत झाला. अजय पांडुरंग परचाके असे मृत पावलेल्या नेरी येथील तलाठ्याचे नाव आहे. ही घटना भंडारा वरठी मार्गावरील गणेश नगरी समोरील रस्त्यावर घडली.
वाळू जप्त केलेला साठा घरकुल लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी नेरी येथील तलाठी अजय परचाके हे खमारी बुज. येथे गेले होते. घरकुल लाभार्थ्यांना वाळू वाटप करण्यासाठी महसूल कर्मचारी खमारी येथे आले होते. दरम्यान काम आटोपून घरी जात असतांना अपघात घडला आणि तलाठ्याचा मृत्यू झाला.
