Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: जगाची चिंता वाढली; तालिबानच्या हाती लागलं कोट्यवधींचं घबाड
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot News

जगाची चिंता वाढली; तालिबानच्या हाती लागलं कोट्यवधींचं घबाड

Surajya Digital
Last updated: 2021/08/18 at 3:41 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

वॉशिंग्टन : अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा मिळवला आहे. त्यातच आता अमेरिकन सैन्याच्या उपकरणांचा एक मोठा हिस्सा तालिबानकडे गेला असल्याची माहिती व्हाईट हाऊसनं दिली आहे. याचे काही फोटो, व्हिडीओ समोर आले आहेत. यात तालिबानचे दहशतवादी अमेरिकन शस्त्रास्त्रांचा वापर करताना दिसत आहेत. दरम्यान, ही शस्त्रं अमेरिकेनं अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलांना दिली होती. अमेरिकन सैन्याच्या उपकरणांचा एक मोठा हिस्सा तालिबानकडे गेला असल्याची माहिती काल व्हाईट हाऊसनं दिली.

अफगाणिस्तानात वीस वर्षानंतर पुन्हा तालिबानची राजवट आली आहे. अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानमधून माघारी परतल्यानंतर तालिबाननं डोकं वर काढले आहे. अल्पावधीतच तालिबाननं अफगाणिस्तानच्या बऱ्याचशा प्रांतात शिरकाव केला आहे. राजधानी काबुलवर कब्जा करत तालिबाननं संपूर्ण अफगाणिस्तानवरच नियंत्रण मिळवले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

आता त्यांच्या हाती अमेरिकेची अनेक अत्याधुनिक उपकरणं लागली आहेत. व्हाईट हाऊसनं याबद्दलची माहिती दिली. गेल्या रविवारीच तालिबाननं विजयाची घोषणा केली आहे. या संदर्भातले काही फोटो, व्हिडीओ समोर आले आहेत. यात तालिबानचे दहशतवादी अमेरिकन शस्त्रास्त्रांचा वापर करताना दिसत आहेत. अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानमध्ये त्यांच्या हातात दिसणारी शस्त्रास्त्रं आता तालिबान्यांच्या हातात दिसू लागली आहेत. ही शस्त्रं अमेरिकेनं अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलांना दिली होती. यात यूएस-६० ब्लॅक हॉक आणि कंदहार विमानतळावरील उपकरणांचा समावेश आहे.

संरक्षण साहित्यामधील सर्व उपकरणं कुठे गेली, याबद्दलची संपूर्ण माहिती आमच्याकडे नाही. मात्र त्या सामग्रीचा बराचसा हिस्सा तालिबान्यांच्या हाती गेला आहे, असं व्हाईट हाऊसच्या सुरक्षा सल्लागारांनी सांगितलं. तालिबान्यांचा सामना करण्यासाठी अमेरिकेकडून ब्लॅक हॉक्स अफगाणिस्तान सरकारला देण्यात आले होते. मात्र सरकारनं तालिबान्यांसमोर गुडघे टेकले. सुरक्षा दलांनी शस्त्र, उपकरणं, हेलिकॉप्टर्सवरील नियंत्रण सोडून दिलं. त्यामुळे बरीचशी अत्याधुनिक शस्त्रं आणि उपकरणं तालिबान्यांच्या ताब्यात गेली, अशी माहिती सुरक्षा सल्लागारांनी दिली.

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #world's #anxiety #Billions #Rupees #fell #hands #Taliban, #जगाची #चिंता #तालिबानच्या #हाती #कोट्यवधींचं #घबाड
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article विवाहित महिलेने दुसऱ्या पुरुषासोबत लिव्ह इनमध्ये राहणे बेकायदेशीर – कोर्ट
Next Article रॅगिंगमुळे मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरचा मृत्यू, वॉशरूममध्ये आढळला मृतदेह

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?