वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा मुलगा हंटर बायडन याने २०१८ मध्ये एका कॉल गर्लवर १८ लाख रुपये ( २५ हजार डॉलर) उधळले. मात्र त्याने हे पैसे जो बायडन यांच्याच खात्यावरुन दिले होते, असे वृत्त अमेरिकेतील दैनिक न्यूयॉर्क पोस्टने दिले आहे.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1408389064210862090?s=19
न्यूयॉर्क पोस्टने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, हंटर बायडन २०१८ मध्ये हॉलीवूडमधील चेटो मारमोंट हॉटेलमध्ये थांबले होते. येथे त्यांनी एका रशियन कॉलगर्लला बोलवले. तिला पैसे देण्यासाठी हंटर बायडन यांनी आपले पिता जो बायडन यांच्या बँक खात्याचा वापर केला होता.
अमेरिकी राष्ट्रपती जो बायडेन यांचा मुलगा हंटर याच्यामुळे बायडेन याच्यावर मान खाली घालण्याची वेळ आली आहे. या संदर्भात न्युयॉर्क पोस्टने प्रसिद्ध केलेल्या एका बातमीनुसार हंटर याने २०१८ साली एका कॉलगर्ल बरोबर रात्र घालविताना तिला द्यायचे पैसे वडील बायडेन याच्या खात्यातून दिले. ही रक्कम थोडी थोडकी नाही तर २५ हजार डॉलर्स म्हणजे १८ लाख रुपये आहे. अर्थात बायडेन यांना या गोष्टीची अजिबात माहिती नव्हती असेही सांगितले जात आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
https://twitter.com/SurajyaDigital/status/1408100284786745351?s=19
बातमीत म्हटल्यानुसार हंटर याने हॉलीवूडच्या चेरॉ मॉरमोंट हॉटेल मध्ये कॉलगर्ल बरोबर रात्र घालविली होती. त्यावेळी त्याने अश्लील व्हिडीओ तयार केले. मे महिन्यात केलेल्या या प्रवासात हंटरने एमराल्ड फँटसी गर्ल या भाड्याने मुली पुरवणाऱ्या माध्यमातून हिरवे डोळे असलेल्या, रशियन, ‘याना’ नावाच्या मुलीची निवड केली होती.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1408630645308329988?s=19
यावेळी हंटरने खोटे नाव घेतले होते आणि मद्य प्राशन केले होते. पेमेंट करताना त्याच्या खात्यातून पैसे जाईनात तेव्हा त्याने वडिलांच्या खात्यातून पैसे भरले होते. ही सर्व माहिती हंटरच्या लॅपटॉप मधून मिळाल्याचा दावा केला जात आहे. हा लॅपटॉप हंटर डायरीप्रमाणे वापरतो. त्यात अनेक मेसेजेस, फोटो, ई मेल्स, चॅटस, अनेक सेल्फी आहेत. हा लॅपटॉप हंटरने दुरुस्ती साठी पाठविला तेव्हा हे प्रकरण उघडकीस आल्याचे सांगितले जात आहे.
* रात्रीची कहाणी कशी आली उघडकीस
हंटर बायडन यांनी कॉल गर्लला दिलेल्या पैशाचा खुलासा त्याच्या लॅपटॉपमुळेच झाला आहे. त्यांचा लॅपटॉप बंद पडला. तो दुरुस्तीसाठी एका दुकानात देण्यात आला. मात्र तो परत घेवून जाण्यास हंटर विसरले. यामध्ये हंटर बायडन यांचे सर्व इमेल, मेसेज,खासगी चर्चेचे रेकाँर्डिंग, अर्थिक व्यवहारांची माहिती होती. ही माहिती न्यूयॉर्क पोस्टच्या हाती लागली. यानंतर हंटर बायडनच्या रंगील रात्रीची कहाणी उघडकीस आली.
* खोट्या नावाने केला होता मेसेज
हंटर बायडन २४ मे २०१८ रोजी हॉलीवूडमधील चेटो मारमोंट हॉटलमध्ये थांबले होते. यावेळी त्यांनी एमराल्ड फॅटन्सी वेबसाईटच्या एजेंट महिला गुलनोरा हिच्याशी संपर्क साधला. तिच्याकडे रशियन कॉलर्गलची मागणी केली. यासाठी २५ हजार डॉलरचे (सुमारे १८ लाख रुपये) पेमेंट करा, असे गुलनोरा हिने सांगितले. हंटर यांनी एका ॲपच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करण्याचा प्रयत्न केला. मात्र काही तांत्रीक अडचणी आल्या. सुरुवातीला त्यांनी ८ हजार डॉलर, त्यानंतर दोन, पुन्हा दुसर्या दिवशी सकाळी ३५०० डॉलर, यानंतर ८ हजार आणि साडे तीन हजार डॉलर असे टप्प्याने एजटला पेमेंट केले. मात्र हे सर्व आर्थिक व्यवहार हा जो बायडन यांच्या खात्यावरुन झाला. तसेच हंटरने कॉलगर्लला आपले नाव रोब असल्याचे सांगितले होते. या नावानेच त्याने मेसेज पाठविला हाेता, असेही या वृत्तामध्ये नमूद करण्यात आले आहे.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1408398707700031493?s=19
कॉलर्गलने २५ हजार डॉलर मिळाले असल्याचा मेसेजही हंटर यांना केला होता. तुम्हाला माझ्याबरोबर वेळ व्यतित करायचा असेल तर पुन्हा या, असेही या मेसेजमध्ये तिने म्हटले होते. सध्या संबंधित कॉलगर्लचा फोन बंद आहे. तसेच एमराल्ड फॅटन्सी ही वेबसाईटही बंद पडली आहे. कॉलगर्लच्या वकिलांनी या प्रकरणावर खुलासा करण्यास नकार दिला आहे. मात्र न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्ताने रंगेल हंटर बायडन यांच्या कारनाम्यांची खमंग चर्चा अमेरिकेत सुरु आहे.