नवी दिल्ली, 7 जून (हिं.स.) गेल्या वर्षी गुरुग्राममधील दोन क्लबमध्ये
झालेल्या बॉम्बस्फोटांप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एनआयएने कॅनडास्थित
खलिस्तानी दहशतवादी गोल्डी ब्रारसह पाच आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.
शुक्रवारी
पंचकुला न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात, एनआयएने
सतींदरजीत सिंग उर्फ गोल्डी ब्रार, सचिन
तालियन, अंकित, भाविश आणि अमेरिकेतील रणदीप सिंग उर्फ रणदीप मलिक यांच्या विरोधात विविध
कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
ब्रार आणि मलिक वगळता इतर सर्वांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
एनआयएला असे आढळून आले की आरोपी हरियाणातील गुरुग्राममधील सेक्टर २९ मधील वेअरहाऊस
क्लब आणि ह्यूमन क्लबमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या कटात सहभागी होते. एनआयएच्या
अधिकृत निवेदनानुसार हरियाणा आणि आसपासच्या भागात हिंसाचार पसरवून सांप्रदायिक द्वेष
पसरवण्यासाठी आणि शांतता भंग करण्याच्या उद्देश बब्बर खालसा इंटरनॅशनल या दहशतवादी
संघटनेचा होता.
बंदी
घातलेल्या बब्बर खालिस्तानी इंटरनॅशनलच्या (बीकेआय) सदस्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केलेला हा हल्ला १० डिसेंबर
२०२४ रोजी करण्यात आला होता. हा दहशतवादी कट गोल्डी ब्रार आणि त्याच्या
सहकाऱ्यांनी रचला असल्याचं एनआयएच्या तपासानंतर उघड झालं होतं. एनआयएने दिलेल्या
निवेदनात ही बाब नमूदही करण्यात आली आहे.