Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: नोकरी गेली, अर्ज करा आणि बेरोजगार भत्ता मिळवा; 40 लाख औद्योगिक कामगारांना फायदा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsअर्थाअर्थ

नोकरी गेली, अर्ज करा आणि बेरोजगार भत्ता मिळवा; 40 लाख औद्योगिक कामगारांना फायदा

Surajya Digital
Last updated: 2020/11/09 at 9:24 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : कोरोना काळात रोजगार गेल्यामुळे अनेकांना आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. त्यांची आर्थिक चणचण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने एक योजना राबवली आहे. सरकारने कर्मचारी राज्य विमा निगमच्या अटल विमा कल्याण योजनेची घोषणा केली होती. त्यामुळे नोकरी गेली तरी अर्ज करुन बेरोजगार भत्ता मिळवू शकता. 40 लाख औद्योगिक कामगारांना याचा फायदा होणार आहे.

कोरोना काळात बेरोजगार झालेल्या लोकांनी दावा केल्यानंतर 15 दिवसांच्या आत सरकारकडून उत्तर मिळणार आहे. 20 ऑगस्ट 2020 रोजी ही घोषणा करण्यात आली होती. नोकरी गमावलेला लोकांना तीन महिन्यांच्या सरासरी पगाराचा 50 टक्के लाभ देण्याची घोषणा केली गेली, जी आधी 25 टक्के होती. या योजनेंतर्गत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची अटही केंद्राने रविवारी रद्द केली आहे.

ज्या कर्मचाऱ्यांचं नाव गेल्या 2 वर्षापासून ईएसआयसी योजनेमध्ये आहे. त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसंच संबंधित कर्मचाऱ्यांचे 1 ऑक्टोबर 2019 ते 31 मार्च 2020 पर्यंत कमीतकमी 78 दिवस काम करणे देखील आवश्यक आहे. नोकरी गेल्यानंतर 30 दिवसांनी कर्मचारी या योजनेसाठी दावा करू शकतात. या निर्णयाचा 40 लाख औद्योगिक कामगारांना फायदा होईल, अशी अपेक्षा आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

अटल विमा व्यक्ती कल्याण योजनेतून लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल. तुम्हाला फक्त आधार कार्ड आणि बँकेच्या खात्याची माहिती देणारी कागदपत्र स्कॅन करुन अपलोड करायची आहे. तसंच ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणं शक्य नसेल तर गरजू व्यक्तींना आधार कार्ड आणि बँक खात्याची माहिती देणारी कागदपत्र तुमच्या सहीसकट जमा करायची आहेत.

ESIC च्या योजनेनुसार, खासगी कंपन्या, कारखाने आणि कारखान्यात काम करणाऱ्या याचा लाभ कर्मचाऱ्यांना होणार आहे. कंपनीतल्या अधिकृत कागदपत्रांच्या आधारे कर्मचारी योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेचा लाभ फक्त 21,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी पगाराच्या कर्मचार्‍यांना उपलब्ध आहे. अपंग कर्मचाऱ्यांना उत्पन्नाची मर्यादा 25,000 रुपये आहे. त्याचबरोबर ईएसआयसी अंतर्गत कंपनीची नोंदणी होणे देखील आवश्यक आहे. ईएसआयसीशी संबंधित कर्मचारी त्यासाठी महामंडळाच्या कोणत्याही शाखेत अर्ज करु शकतात.

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कोरोना : साखरपुडा मोडल्याने आयुष्यभर ब्रम्हचारी राहणा-या पाटलांनी केले 66 व्या वर्षी लग्न
Next Article “तुरुंग अधीक्षकांनी मारहाण केली, कृपया न्यायालयाला माझी मदत करण्यास सांगा”

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?