Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आर माधवनला कोरोनाची लागण, दिली हटके अंदाजात माहिती
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुड

आर माधवनला कोरोनाची लागण, दिली हटके अंदाजात माहिती

Surajya Digital
Last updated: 2021/03/25 at 7:22 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : अभिनेता आर माधवनला कोरोनाची लागण झाली आहे. माधवनने आपल्या ट्वीटमध्ये 3 ईडियट्समधील पात्रांची नावे घेत याबाबत माहिती दिली आहे. फरहान नेहमी रँचोचे अनुकरण करत होता आणि व्हायरस आमच्या मागे होता. पण यावेळी व्हायरसने आम्हाला पकडले आहे. पण ऑल इस वेल आहे, आणि कोरोनाही लवकरच ऑल इज वेल होईल. ही एक जागा अशी आहे तिथे आम्हाला राजू (शर्मन) नको आहे. दरम्यान, अभिनेता आमिर खानलाही (रँचो) कोरोनाची लागण झाली आहे.

सामान्य व्यक्तीच नव्हे, तर चित्रपटसृष्टीतील कलाकारही कोरोना व्हायरसच्या तावडीत सापडताना दिसत आहेत. नुकतेच ‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट’ आमिर खान कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे बुधवारी (२४ मार्च) त्याच्या प्रवक्त्याने सांगितले होते. यानंतर आता आमिर खानचाच खास मित्र आणि सहकलाकार आर माधवनही कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. माधवनने सोशल मीडियावर मजेशीर अंदाजात ही माहिती दिली आहे.

माधवनने ‘३ इडियट्स’ चित्रपटाचे एक पोस्टर शेअर केले आहे, ज्यामध्ये तो आमिर खानसोबत बसलेला दिसत आहे. त्याने हा फोटो शेअर करत लिहिले की, शेवटी व्हायरसने रँचोपाठोपाठ फरहानलाही पकडले आणि ही एक अशी जागा आहे, जिथे राजू येऊ नये असे त्यांना वाटत आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

माधवनने ट्वीटर करत लिहिले की, “फरहानने रँचोला फॉलो केले आणि व्हायरस नेहमी आमच्या मागे राहिला. परंतु यावेळी आम्हाला त्याने पकडले. ऑल इझ वेल आणि कोव्हिड लवकरच बरा होईल. ही एक अशी जागा आहे, जिथे राजू येऊ नये, असे आम्हाला वाटत आहे. तुम्हा सर्वांच्या प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद. मी एकदम ठणठणीत आहे.”

https://twitter.com/ActorMadhavan/status/1374984964467384320?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1374984964467384320%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F

विशेष म्हणजे ‘३ इडियट्स’ चित्रपटात माधवनने फरहानची भूमिका साकारली होती, तर आमिर रँचोच्या भूमिकेत होता. याव्यतिरिक्त शरमन जोशीने राजूची भूमिका साकारली होती. तसेच बोमन इराणी चित्रपटात वीरू सहस्त्रबुद्देच्या भूमिकेेता होते. हा चित्रपट चांगलाच सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले होते.

आमिर खानने कोरोनाची लक्षणे दिसायला लागल्यानंतर कोरोना चाचणी केली होती. त्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आता तो घरामध्येच क्वारंटाईनमध्ये आहे. याव्यतिरिक्त नियमांचे पालन करत आहे. आमिरने त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना स्वत: ची कोरोना चाचणी करून घ्यायला सांगितले होते.

You Might Also Like

तमिळ अभिनेते माधन बॉब यांचे निधन

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

TAGGED: #Corona #infection #RMadhavan, #आरमाधवनला #कोरोनाची #लागण #दिली #हटकेअंदाजात #माहिती
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मार्कंडेय रुग्णालयात अॉक्सिजन टाकीचा स्फोट, दोघांचा मृत्यू
Next Article ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?