Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला, सीआरपीएफ जवान मुनीर अहमद बडतर्फ
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला, सीआरपीएफ जवान मुनीर अहमद बडतर्फ

admin
Last updated: 2025/05/04 at 6:17 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली , 4 मे (हिं.स.)।केंद्रीय राखीव दलातील पोलीस कॉन्स्टेबल मुनीर अहमदविरुद्ध कठोर कारवाई करण्यात आली आहे.औपचारिक मान्यता नसतानाही मुनीर अहमदने पाकिस्तानी महिलेशी विवाह केला होता. त्यानंतर आता सीआरपीएफने मुनीर अहमदला राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे सांगत सेवेतून बडतर्फ केले आहे. मुनीरवर पाकिस्तानी महिलेसोबतचे विवाह केल्याचे लपवून ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने व्हिजिटिंग व्हिसा असलेल्या पाकिस्तानात परत पाठवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये मुनीर अहमदची पत्नी देखील होती. मात्र कोर्टाच्या आदेशानंतर तिला भारतात राहण्याची परवानगी मिळाली होती. मात्र, आता सीआरपीएफने मुनीरविरोधात कडक कारवाई केली आहे. सीआरपीएफकडून प्रक्रिया किंवा मंजुरी मिळण्यापूर्वीच मुनीर अहमदने व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलद्वारे विवाह केला होता. कोर्टात हे प्रकरण गेल्यानंतर सीआरपीएफकडून शिस्तभंगाची कारवाई सुरु करण्यात आली होती. जम्मूमधील हंडवाल येथील रहिवासी मुनीर २०१७ मध्ये सीआरपीएफमध्ये सामील झाला होता. मात्र आता मुनीरवर देशाच्या सुरक्षेशी तडजोड केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

“हा गंभीर चिंतेचा विषय आहे. सीआरपीएफच्या ४१ बटालियनचे सीटी/जीडी मुनीर अहमद यांना पाकिस्तानी नागरिकाशी विवाह केल्याचे लपवल्याबद्दल आणि व्हिसाच्या वैधतेपेक्षा जास्त काळ तिला जाणूनबुजून आश्रय दिल्याबद्दल तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. त्याचे कृत्य सेवा वर्तनाचे उल्लंघन करणारे आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे आढळून आले आहे,” असे सीआरपीएफकडून सांगण्यात आले आहे.

सीआरपीएफ जवान मुनीर खानचा अडीच महिन्यांपूर्वी पाकिस्तानी नागरिक मीनल खानशी विवाह झाला होका. त्यानंतर ती व्हिजिटिंग व्हिसावर भारतात आली आणि नंतर तिने दीर्घकालीन व्हिसासाठी अर्ज केला होता. पण तिच्या व्हिसाची मुदत २२ मार्च २०२५ रोजी संपली होती आणि तरीही ती भारतात राहत होती. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यास सांगितले होते. त्यानंतर मीनल खानची दीर्घकालीन व्हिसासाठी मुलाखत घेण्यात आली होती. ज्या दिवशी ती अटारी-वाघा सीमेवर होती त्याच दिवशी जम्मू आणि काश्मीर हायकोर्टात तिच्या याचिकेवर सुनावणी पार पाडली. कोर्टाने अंतरिम आदेश दिल्यानंतर तिला सीमेवरून परत पाठवण्यात आले होते.

—————

You Might Also Like

शासकीय अधिकाऱ्यांनी मनात अपेक्षा न ठेवता काम करावे – हसन मुश्रीफ

खामेनी यांचे अस्तित्व संपवून टाकण्याचा इस्रायलचा लष्कराला आदेश

भारत- पाकिस्तान युद्धबंदीसाठी पाकिस्तानने घेतली सौदीची मदत

भारताकडे लवकरच येतील हायपरसॉनिक ग्लाइड क्षेपणास्त्रे

विमानांच्या सुरक्षेला धोकादायक अडथळे हटवणार

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कापूस बियाण्यांच्या विक्रीवर 15 मेपर्यंत निर्बंध कारवाईबाबत विक्रेत्यांना कृषी विभागाचा इशारा
Next Article १२८ वर्षीय योग गुरु स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा कालवश

Latest News

ग्रुपने लालपरी बुक करा; कमी तिकिटात विठ्ठल दर्शनाला जा
महाराष्ट्र June 20, 2025
राहुल गांधींना मिळाला नवा सरकारी बंगला
महाराष्ट्र June 20, 2025
आदिवासी समाजाच्या गावात १७ प्रकारच्या योजना राबविणार – मुख्यमंत्री
महाराष्ट्र June 20, 2025
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धरणगावात ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन
महाराष्ट्र June 20, 2025
अफगाणिस्तानच्या पश्चिम भागात ४.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
महाराष्ट्र June 20, 2025
शासकीय अधिकाऱ्यांनी मनात अपेक्षा न ठेवता काम करावे – हसन मुश्रीफ
देश - विदेश June 20, 2025
पंढरपूरातील चंद्रभागा नदीत बुडून एका तरुणाचा मृत्यू
सोलापूर June 20, 2025
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आघाडीचा लवकरच निर्णय – शरद पवार
राजकारण June 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?