मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचं आज निधन झालं. हृदय विकाराचा झटका आल्यानं अविनाश यांची प्राणज्योत मालवली. आज सकाळी दहा वाजता त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठी सिनेसृष्टीतील देखण्या अभिनेत्यांपैकी अविनाश एक होते.
अविनाश खर्शीकर यांच्या निधनावर सिनेसृष्टीतील त्यांचे सहकलाकार आणि चाहते शोक व्यक्त केला आहे.
चित्रपटसृष्टीतील विनोदी अभिनेता म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. मराठी सिनेसृष्टीत 90 च्या दशकातील चाहता कलाकार म्हणून ते परिचीत होते. तुझं आहे तुझ्यापाशी मधला ‘ श्याम’, वासूची सासू’ अशी नाटके गाजली. त्यांचं, झोपी गेलेला जागा झाला… हे नाटक फार गाजलं. सौजन्याची ऐशीतैशी, लफडा सदन, अपराध मीच केला ही नाटके आणि आधार, आई थोर तुझे उपकार, घायाळ, लपवाछपवी, माफीचा साक्षीदार असे अनेक चित्रपट त्यांनी केले. लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, प्रशांत दामले यांच्यासह अनेक चित्रपटात त्यांनी काम केलंय.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अविनाश खर्शीकर यांनी चित्रपट, मालिका, रंगभूमी अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम केलं होतं. १९७८ मध्ये ‘बंदिवान मी या संसारी’ या चित्रपटाद्वारे अविनाश यांनी सिनेसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यांनी जसा बाप तशी पोरं, आधार, आई थोर तुझे उपकार, माझा नवरा तुझी बायको, चालू नवरा भोळी बायको, बकुळा नामदेव घोटाळे, घायाळ, लपवाछपवी, माफीचा साक्षीदार यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. होत्या तुझं आहे तुजपाशी, सौजन्याची ऐशी तैशी, वासूची सासू, अपराध मीच केला, दिवा जळू दे सारी रात, लफडा सदन ही त्यांची नाटकं तर प्रचंड गाजली होती.
९० च्या दशकात अभिनयासोबतच अविनाश यांंच्या लुकची देखील तितकीत चर्चा सिनेसृष्टीत होती. सदाबहार असे अविनाश खर्शीकर यांची पहिली दैनंदिन मालिका ‘दामिनीत’ त्यांनी महत्वाची भुमिका साकारली होती.