Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: दिलीप कुमार यांच्या निधनानंतर पाकिस्तानमध्येही हळहळ
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुड

दिलीप कुमार यांच्या निधनानंतर पाकिस्तानमध्येही हळहळ

Surajya Digital
Last updated: 2021/07/07 at 9:16 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : दिलीप कुमार दिलीप कुमार यांचं निधन झालं. यानंतर पाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान खान यांनी दुःख व्यक्त केलं आहे. “शौकत खनूम मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल ऍण्ड रिसर्च सेंटरसाठी दिलीप कुमार पाकिस्तान आणि लंडनमध्ये कार्यक्रमासाठी आल्यामुळे बराच निधी गोळा झाला.” अशी आठवण खान यांनी सांगितली आहे. SKMTH हे हॉस्पीटल खान यांच्या आईंच्या स्मरणार्थ लाहोर आणि पेशावरमध्ये आहे. शाहिद आफ्रिदीनेही दुःख व्यक्त केले आहे.

ज्येष्ठ अभिनेते, भारतीय सिनेसृष्टीतील कोहिनूर हरवला, दिलीपकुमार यांचे निधन, चित्रपट सृष्टीवर शोककळा https://t.co/3v2KqFjmRe

— Surajya Digital (@SurajyaDigital) July 7, 2021

दिलीप कुमार यांचा जन्म पाकिस्तानच्या पेशावरमध्ये किसा खवानी बाजार भागात 11 डिसेंबर 1922 साली झाला होता. दिलीप कुमार यांचं पेशावरमध्ये असलेलं वडिलोपार्जित घर तिथल्या पख्तुनख्वा सरकारने विकत घ्यायला मंजुरी दिली होती. दिलीप कुमार यांच्या या घराला संग्रहालय बनवण्याची तिथल्या सरकारची योजना आहे.

Apart from this, for my generation Dilip Kumar was the greatest and most versatile actor.

— Imran Khan (@ImranKhanPTI) July 7, 2021

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान  आणि माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी यांनी दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘दिलीप कुमार यांच्या निधनामुळे दु:ख झालं आहे.  SKMTH साठी निधी गोळा करायला ते पुढे आले हे मी कधीही विसरू शकत नाही.

निधीचे सुरुवातीचे 10 टक्के पैसे जमा करणं सगळ्यात कठीण होतं. दिलीप कुमार पाकिस्तान आणि लंडनमध्ये कार्यक्रमासाठी आल्यामुळे बराच निधी गोळा झाला,’ असं इम्रान खान म्हणाले. माझ्या पिढीसाठी दिलीप कुमार सर्वोत्तम आणि अष्टपैलू अभिनेते होते, असं ट्वीटही इम्रान खान यांनी केलं.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

दिलीपकुमार यांची पत्नी सायरा बानो, कुटुंबीय, मित्र आणि चाहते अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी जमले. तिरंगामध्ये लपेटून निवासस्थानाकडे जाण्यासाठी शेवटचा प्रवासाचा क्षण (सौजन्य – पिंकव्हिला) #surajyadigital #सुराज्यडिजिटल #DilipKumar #RIPhttps://t.co/jD1lk0i6nW

— Surajya Digital (@SurajyaDigital) July 7, 2021

SKMTH म्हणजे शौकत खनूम मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल ऍण्ड रिसर्च सेंटर हे पाकिस्तानच्या लाहोर आणि पेशावरमध्ये आहे. लाहोरमधलं SKMCH&RC शौकत खनूम मेमोरियल ट्रस्टचं पहिलं रुग्णालय आहे. इम्रान खान यांची आई शौकत खनूम यांचं 1985 साली कॅन्सरने निधन झालं. यानंतर इम्रान खान यांनी कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय घेतला. यासाठी निधी गोळा करायला दिलीप कुमार यांनी पुढाकार घेतला.

https://twitter.com/SAfridiOfficial/status/1412627136821800960?s=19

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी यानेही दिलीप कुमार यांच्या निधनामुळे शोक व्यक्त केला आहे. ‘आपण सगळे अल्लाहचे आहोत, त्यामुळे आपल्याला परत तिकडे जावं लागतं. खैबर पख्तुनख्वापासून मुंबईपर्यंत आणि संपूर्ण जगभरात युसूफ खान साहेबांच्या चाहत्यांचं हे खूप मोठं नुकसान आहे. ते आमच्या मनात राहतील. सायरा बानो यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत,’ असं शाहिद आफ्रिदी म्हणाला.

अभिनेता दिलीप कुमारांच्या अंत्यदर्शनासाठी राजकीय व्यक्तींसह सेलेब्रेटींची गर्दी https://t.co/ZkzmVy7sU7

— Surajya Digital (@SurajyaDigital) July 7, 2021

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #Afterdeath #DilipKumar #stir #inPakistan #aswell, #दिलीपकुमार #निधनानंतर #पाकिस्तानमध्येही #हळहळ
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अभिनयातील भीष्माचार्य काळाच्या पडद्याआड (ब्लॉग))
Next Article फेडररला पराभवाचा धक्का, विम्बल्डनमधून बाहेर

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?