ढाका : बांगलादेशाच्या 50 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्य अतिथी म्हणून बांगलादेश दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी जोशेश्वरी काली मंदिरात जाऊन पूजा अर्चा केली. देवीची मनोभावे पूजा केल्यानंतर मोदींनी माध्यमांशी संवाद साधला. ‘आज मला काली मातेची मनोभावे पूजा करण्याचं सौभाग्य मिळालं. कोरोनातून मुक्ती मिळावी म्हणून मी कालीमातेला साकडं घातलं,’ असं ते म्हणाले.
* भारत बांगलादेशातील कालीमातेच्या मंदिर परिसरात कम्युनिटी हॉल बांधून देणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेश दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी जोशेश्वरी काली मंदिरात जाऊन पूजा केली. यावेळी त्यांनी मंदिर परिसरात कम्युनिटी हॉल बांधून देण्याची इच्छा व्यक्त केली. त्याला बांगलादेश सरकारने संमतीही दिली आहे. कालीमातेच्या या मंदिरात यात्रेदरम्यान दोन्ही देशातील भाविक येतात. भक्तांना या हॉलमध्ये आश्रय मिळेल तसेच, धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक उपक्रमही राबवले जावेत, असा त्यामागचा उद्देश आहे.