मुंबई : बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे दिया मिर्झा. दिया तिच्या सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत असते. ती सध्या फिल्मी दुनियात दिसत नसली तरी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियाच्या माध्यमातून दिया तिचे मत मांडताना दिसते. नुकताच दियाने सोशल मीडियावर एक पोस्ट करत पुरूषांच्या प्रायव्हेट पार्टबद्दल कमेंट केली आहे. यामुळे पुन्हा एकदा दिया चर्चेत आली आहे.
https://twitter.com/deespeak/status/1375291538939412490?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1375291538939412490%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fmanoranjan-news%2Fdia-mirza-tweet-goes-viral-as-she-comments-on-report-related-to-man-penises-dcp-98-2430548%2F
दियाने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत पुरूषांच्या प्रायव्हेट पार्टबद्दल कमेंट केली आहे. या ट्विटमध्ये दियाने वाढत्या प्रदुषणामुळे होणाऱ्या दुष्परिणामांकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. एवढंच नाही कर तिने संशोधनावर आधारित एक अहवालही त्यासोबत शेअर केला आहे. “प्रजनन दरामध्ये माणूस संकटाचा सामना करत आहे, कारण मानवी लिंगाचा आकार लहान होत आहे आणि जनन इंद्रियही खराब होत आहे. त्याचबरोबर मानवी प्रजननालाही अवघड परिस्थितीकडे ढकलत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
थोडक्यात दुषित पर्यावरणाचा परिणाम हा पुरूषांच्या प्रायव्हेट पार्टवर होत आहे.” असे त्या अहवालात म्हटले आहे. “आता तरी जग हवामान बदल, वायू प्रदुषण या मुद्द्यांना अधिक गांभीर्याने घेईल.” असे कॅप्शन दियाने तो अहवाल शेअर करत दिलं आहे.
दियाचे हे ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. लोक यावर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. दिया पर्यावरणाच्या बाबतीत जागरूक आहे. ती नेहमची त्या बद्दल ट्विट करत लोकांना जागरूक करण्याचा प्रयत्न करते.
* लग्नात महिला पंडितने केल्या सगळ्या विधी
दियाने उद्योजक वैभव रेखीसोबत फेब्रुवारीमध्ये लग्नगाठ बांधली आहे. दियाचं हे दुसरं लग्न आहे. या लग्नात दिया आणि वैभवचे काही खास मित्र आणि कुटुंबीयच सहभागी झाले होते. तिच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. कारण तिच्या लग्नात कोणत्याही प्रकारच्या प्लास्टिकचा वापर केला नव्हता. सोबतच तिच्या लग्नात एका महिला पंडितने सगळ्या विधी केल्या होत्या. तर दुसरीकडे दिया मालदिवमध्ये सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे. बीचवरील तिचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.