Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: जिल्हा बँकेच्या संचालक पदाच्या अपात्रतेचे प्रकरण : बच्चू कडू यांच्या शिक्षेलाच उच्च न्यायालयाची स्थगिती
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot News

जिल्हा बँकेच्या संचालक पदाच्या अपात्रतेचे प्रकरण : बच्चू कडू यांच्या शिक्षेलाच उच्च न्यायालयाची स्थगिती

admin
Last updated: 2025/03/19 at 1:18 PM
admin
Share
4 Min Read
SHARE

अमरावती, 19 मार्च (हिं.स.)।

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे राजकारण पुन्हा एकदा विरोधकांसाठी धक्कादायक वळणावर पोहोचले आहे. बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना न्यायालयाने शिक्षा ठोठावल्याने त्यांना अपात्र ठरवावे, अशी याचिका विरोधकांनी दाखल केली होती. त्यानंतर बँकेचे अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू यांना बँकेच्या संचालक पदावरून अपात्र करण्याकरिता विभागीय सहनिबंधकांनी नोटिस बजाविली होती. १८ मार्चपर्यंत त्यांना प्रत्यक्ष हजर राहून उत्तर देण्याचे निर्देशही दिले होते. मात्र ज्या प्रकरणावरून हे राजकारण तापले, त्या शिक्षेलाच बच्चू कडू ‌यांनी मुंबई उच्च न्यायालयातून स्थगिती मिळवली आहे. त्यामुळे आता ही सुनावणी निरर्थक झाली – असून विरोधकांना मोठा धक्का बसलेला आहे. उल्लेखनीय म्हणजे मंगळवारी या संदर्भात सुनावणी असताना योगायोगाने विभागीय सहनिबंधक रजेवर गेल्याने सदरची सुनावणी देखील टळली आणि इकडे हायकोर्टानी दिलासा दिला..

जिल्हा मध्यवर्ती बँकेत सत्तासंघर्ष चांगलाच पेटला आहे. बबलू देशमुख गटातील संचालक हरीभाऊ मोहोड यांच्यासह ११ संचालकांनी बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना बँकेच्या संचालक पदावरून अपात्र करण्याबाबतची याचिका दाखल केली. नाशिक जिल्हा न्यायालयाने त्यांना एका प्रकरणात एका वर्षाची शिक्षा ठोठावली असल्याचा दाखला त्यांनी यामध्ये दिला आहे.

एक वर्षापेक्षा अधिक शिक्षा लागलेले संचालक हे या पदाकरिता अपात्र ठरतात अशी बँकेच्या उपविधीत तदतूद असल्याने या नियमांचा आधार घेत विभागीय सहनिबंधक यांनी आपणात अपात्र का करण्यात येऊ नये, अशी नोटिस ७ फेब्रुवारीच्या पत्रान्वेदिली. याकरिता बच्चु कडू यांना सोमवार, २४ फेब्रुवारी, रोजी दुपारी ३ वाजता साक्ष नोंदविण्याकरिता समक्ष अथवा प्राधिकृत प्रतिनिधीमार्फत उपस्थित राहून आपले म्हणणे सादर करावे, असे सुचविले होते. मात्र सुनावणीदरम्यान त्यांनी १० मार्च पर्यंत बाजु मांडण्याकरिता मुदत मागितली असता. त्यांची ही मागणी मान्य करीत विभागीय सहनिबंधकांनी त्यांना १० मार्चपर्यंत मुदतवाढ देत अपात्रतेबाबतचा खुलासा सादर करण्याचे आदेश दिले होते.

परंतु त्यांना आणखी मुदतवाढीची अपेक्षा असल्याने अखेर त्यांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. न्यायालयाने त्यांना शेवटची संधी देत आठ दिवसांची म्हणजे मंगळवारी १८ मार्च पर्यंत आपली बाजु मांडण्याकरिता मुदत दिली ही सुनावणी अंतिम असल्याचे आदेशही दिल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले होते, मुदत वाढीचा लाभ घेत या आठ दिवसातच बच्चू कडूंनी मुंबई उच्च न्यायालयात त्यांच्यावर लागलेल्या शिक्षे विरोधात याचिका दाखल करून स्थगिती मिळवण्याकरिता प्रयत्न सुरू केले. सोमवारी यावर सुनावनी होऊन त्यांच्या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली त्यामुळे विरोधकांना मोठा धक्का बसलेला आहे, कारण या स्थितीमुळे अपात्र ते संदर्भात प्रकरण आता निष्पळझालेले आहेत.

अन्यथा बच्चू कडू अपात्र झाले असते

बच्चू कडू यांना अपात्र करण्याबाबत त्यांचे म्हणणे मांडण्याकरता उच्च न्यायालयाने 18 मार्चशेवटची सुनावणी घेण्याबाबतचे आदेश दिले होते, मंगळवारी 18 मार्च रोजी सुनावणी झाली असती बच्चू कडू हे संचालक पदावरून अपात्रझाले असते हे निश्चित, परंतुबच्चूकड्यांना मुंबई उच्च न्यायालयाचा स्थगिती वरील आदेश अप्राप्त असल्याने त्यांना आज सुनावणी दरम्यान तो सादर करता आला नसता, परंतु योगायोगाने ऐनवेळी विभागीय सहनिबंधक हे रजेवर गेल्याने सुनावणीस टळली आणि बच्चू कडू नशीबवान ठरले त्यामुळे बुधवार पर्यंत त्यांनी आदेश विभागीय सहनिबंधकाला दिल्यास सुनावणीचा काहीच अर्थ राहणार नाही हे मात्र निश्चित, विभागीय सहनिबंधकांची रजा योगायोग होती की आणखी काही अशी चर्चा आता सहकार क्षेत्रात सुरू झाली आहे.

विरोधकांचा डाव फसला

दिव्यांगाच्या विविध मागण्यासाठी आंदोलन केले तेव्हा गुन्हे दाखल होवून न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. आम्ही एका चांगल्या कामासाठी आंदोलन केले. पण, विरोधकांना याचा गैरफायदा घेत अपात्र करण्यात यावे, अशी याचिका दाखल केली. मात्रहायकोर्टाने आम्हाला स्थगिती दिली आहे, विरोधकांचा डाव फसला आहे.

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article हिंजवडीत टेम्पो ट्रव्हरला आग : चौघांचा मृत्यू, ६ जखमी
Next Article धोनीचा यंदाचा आयपीएल हंगाम असणार शेवटचा आयपीएल हंगाम?

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?